टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Solapur News: उजनी धरणाने जून महिन्यातच ओलांडली पन्नाशी; धरणात जमा झालाय तब्बल 91 टीएमसी पाणीसाठा; यंदा महापूराची शक्यता

Ujjani Dam: उजनी धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच धरण यंदा जून महिन्यातच 50 टक्केच्या पुढे भरले असून धरणात सध्या जवळपास 91 टीएमसी पाणीसाठा जमा झालेला आहे.

Solapur News: उजनी धरणाच्या (Ujjani Dam) इतिहासात पहिल्यांदाच धरण यंदा जून महिन्यातच 50 टक्केच्या पुढे भरले असून धरणात सध्या जवळपास 91 टीएमसी पाणीसाठा जमा झालेला आहे. यावर्षी मान्सून पूर्व पावसाने घातलेल्या धुमाकूळामुळे उजनी धरण वजा 23 टक्क्यातून आधीक 50% असा प्रवास केवळ 30 दिवसात पूर्ण केला आहे. गेल्या वर्षी उजनी धरण 3 ऑक्टोबरला पन्नास टक्के भरले होते. यावर्षी मात्र 17 जून रोजी 50% ची पातळी धरणाने ओलांडली आहे.

सध्या पुन्हा एकदा मान्सूनच्या आगमनानंतर पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू झाल्याने धरणात 14 हजार 642 क्युसिक विसर्गाने पाणी जमा होत आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास पुढच्या पंधरा दिवसात उजनी धरण 100% भरण्याची शक्यता आहे. यामुळे यंदा उजनी धरणा मुळे महापुराची शक्यता तज्ञांकडून वर्तविले जात आहे.

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 12 फुटांची वाढ

दुसरीकडे राज्यात ठिकठिकाणी दमदार पाऊस कोसळला असून पाणी टंचाईचे संकट मिटले आहे. अशातच, कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात रात्रीपासून पावसाची उघडीप आहे. मात्र गेल्या 24 तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 12 फुटांची वाढ झाली आहे. पंचगंगेची पाणी पातळी 25 फूट 11 इंचांवर पोहचली असून राजारामसह 18 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत धरणात अधिकचा साठा असल्याने भविष्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेता धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. राधानगरी धरणाच्या पायथा विद्युतगृहातून 2500 क्युसेक पाण्याचा प्रतिसेकंद विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे. तर कुंभी धरणातून 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग कुंभी नदीपात्रात सुरू आहे. पर्यायाने पंचगंगा नदीपात्रात पाण्याची मोठी आवक होत असल्याने गेल्या 24 तासात पाणी पातळीत कमालीची वाढ झाली.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सोलापुरात अवैध हातभट्टी व मद्यविक्रीविरोधात धडक कारवाई; २३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर विधान परिषद निवडणूक: शेकापचा भाजपला पाठिंबा, राजकीय समीकरणे बदलणार!

Solapur Crime News: ‘पायापासून छातीपर्यंत रोलर अंगावरून गेला…’; बार्शीत क्रिकेटचा पीच तयार करताना 15 वर्षीय मुलाचा मृत्यू, सगळे हळहळले!

Gold Price Today : सोन्याचे भाव पुन्हा कडाडले, आता खरेदी विसराच.. तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचे दर चेक करा पटापट

राजकारणातील सर्वात मोठी बातमी ! बड्या नेत्यासह 25000 जणांचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंची ताकद वाढली

मोठी बातमी! पंजाबमध्ये आपच्या वादळात भाजप भुईसपाट; यापूर्वी असा पराभव कधीच झाला नाही, आम आदमी पार्टीचा 680 जागांवर विजय