टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Puri Rath Yatra 2026 : भगवान जगन्नाथ रथ यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, 200 जण जखमी, एकाचा मृत्यू

मोठी बातमी समोर येत आहे, पुरी रथयात्रेमध्ये गरुवारी मोठी दुर्घटना घडली आहे. यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 200 जण जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Puri Rath Yatra 2026 : भगवान जगन्नाथ रथ यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, 200 जण जखमी, एकाचा मृत्यू

मोठी बातमी समोर येत आहे, पुरी रथयात्रेमध्ये गरुवारी मोठी दुर्घटना घडली आहे. यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 200 जण जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ग्रँड रोडवर असलेल्या मार्केट चौक आणि मिरची कोर्ट चौकादरम्यान या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येनं जमले होते. याच दरम्यान ही घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना भगवना जगन्नाथ यांच्या ‘पहंडी’ विधीदरम्यान घडली आहे. भाविक प्रचंड संख्येनं या ठिकाणी जमा झाले होते. याचवेळी गोंधळ झाल्याने ही चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या घटनेत 200 जण जखमी झाले आहेत तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत 200 भाविक जखमी झाल्याची घटना घडली आहे, तर एका भाविकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या भाविकांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर घटनास्थळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून, बचाव पथकाकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

रथ यात्रेसाठी मोठ्या संख्येनं भाविक एकत्र आले होते. मात्र तीव्र उष्णता आणि आद्रतेचा भाविकांना त्रास झाला. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात ज्या लोकांना दाखल करण्यात आलं होतं, त्यातील अनेक जणांना उष्णता आणि आद्रतेमुळे त्रास झाला होता.यातील अनेकजणांवर प्रथमोपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे, तर या घटनेत जे गंभीर जखमी झाले आहेत, त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीसांचं पथक आणि आपत्ती व्यवस्थापनाचं पथक तातडीने घटनास्थळी हजर झालं. प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या आपत्कालीन मार्गाद्वारे या घटनेत जखमी झालेल्या भाविकांना बाहेर काढण्यात आले, त्यानंतर त्यांना रुग्णालयता दाखल करण्यात आलं. या काळात बचाव पथकाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. या घटनेतील काही जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Jagannath Yatra 2026: आजपासून जगन्नाथ पुरी यात्रा सुरू! भगवंत रथात बसून नेमके कुठे जातात? रथाची दोरी ओढण्याचं महत्त्व जाणून थक्क व्हाल..

Gold Price Today : सोनं-चांदीचे नवे दर आले, सराफा बाजारात मोठा उलटफेर

Dattatray Bharne: देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर राज्याचे नेतृत्व कोण करणार? कृषिमंत्र्यांनी बोलून दाखवली मनातील इच्छा; म्हणाले…

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात

Bogus Seeds: बोगस बियाणं ओळखावं कसं? कुठं करावी तक्रार, एका क्लिकवर सर्व जाणून घ्या

Gold Price Today: सोन्याने पुन्हा उडवली झोप, वीकेंड जवळ येतानाच सराफा बाजारात मोठी घडामोड; 10 ग्रॅम सोनं..