टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

भेसळखोरांना मृत्युदंडाची शिक्षा देणार? विधानसभेत प्रश्न; मंत्री नरहरी झिरवळांचे मोठे विधान

राज्यात वाढत्या भेसळीच्या घटनांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याशी गंभीर खेळ सुरू असल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला. आमदार प्रकाश सोळंके यांनी भेसळखोरांविरोधात कठोर कायदा करण्याची मागणी करत अशा गुन्हेगारांना जन्मठेप किंवा मृत्युदंडाची शिक्षा देण्याची तरतूद करण्याबाबत सरकारची भूमिका विचारली, त्यावर मंत्री नरहरी झिरवळांनी मोठे विधान केले आहे.

भेसळखोरांना मृत्युदंडाची शिक्षा देणार? विधानसभेत प्रश्न; मंत्री नरहरी झिरवळांचे मोठे विधान

Narhari Zirwal on Adulterators Death Penalty: भेसळखोरांना मृत्युदंडाची शिक्षा देणार का?असा सवाल विधानसभेत विचारण्यात आला. त्यावर मंत्री नरहरी झिरवळ यांनी मोठे विधान केले. राज्यात वाढत्या भेसळीच्या घटनांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याशी गंभीर खेळ सुरू असल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला. आमदार प्रकाश सोळंके यांनी भेसळखोरांविरोधात कठोर कायदा करण्याची मागणी करत अशा गुन्हेगारांना जन्मठेप किंवा मृत्युदंडाची शिक्षा देण्याची तरतूद करण्याबाबत सरकारची भूमिका विचारली. त्यावर झिरवळ यांनी सभागृहात मोठी माहिती दिली.

कायद्यातच मृत्यदंडाची शिक्षा

आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार हाती घेतल्यापासून दणादण कारवाई सुरू आहे. दूध भेसळीच्या रॅकटने जनताही हादरून गेली आहे. अवघ्या पाच रुपयांत तयार होणारे केमिकल, रसायुक्त दूध 70 ते 90 रुपये लिटरने विक्री होत असल्याच्या धक्कादायक बाबी समोर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रापासून ते पार विदर्भापर्यंत अनेक दूध डेअरी, दूध उत्पादकांवर धाडी घातल्यानंतर भयावह सत्य समोर आले आहे. हा मुद्दा आज पावसाळी अधिवेशनातही गाजला. अनेक आमदारांनी या मुद्दावर सरकारकडे विचारणा केली. सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावर उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री नरहरी झिरवळ यांनी विद्यमान कायद्यानुसार दोषींना एक लाख रुपयांच्या दंडापासून ते मृत्युदंडापर्यंत शिक्षेची तरतूद असल्याचे सभागृहात स्पष्ट केले.

गोपीचंद पडळकर संतप्त

सत्ताधारी बाकीवरील अनेक सदस्यांनी दूध भेसळीवर संताप व्यक्त केला. दूध संघावर कारवाई करण्यापूर्वी दूध किती येत होते आणि किती दूध जाते याची तपासणी करावी. तर राज्यातील दुधात किती घट झाली? दुधात भेसळ करणाऱ्या नराधमांना शिक्षा करावी. या व्यवयायात अनेक पांढरपेशी लोक आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

कारवाई होताच राज्यातील दूध उत्पादनात 25 टक्के घट

त्यांच्या प्रश्नानंतर राज्यातील भेसळयुक्त दुधावर कारवाई केल्यानंतर दुधात 25 टक्के घट झाली आहे, अशी माहिती नरहरी झिरवळ यांनी दिली. दुधात घट दिसत आहे मग अश्या दूध संघावर गुन्हे दाखल करणार आहात का, कारवाई कधी करणार आहोत असा सवाल पडळकर यांनी विचारला. त्यावर भेसळ करणाऱ्यावर योग्य कारवाई केली जाईल, असे मंत्री झिरवळ म्हणाले.

तुकाराम मुंडे यांची तीन वर्षे बदली नको

आमदार किशोर पाटील यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांची अनेक वेळा बदली झाली आहे. पण आता ते चांगल काम करत आहेत तर त्यांना तीन वर्ष या खात्यात काम करू द्यावं, अशी मागणी त्यांनी केली. तर आमदार विकास ठाकरे यांनी आमच्या पक्ष कार्यालयात जेवण आमदार अमित झनक करत होते त्यात माशी आढळली, अशी धक्कादायक माहिती दिली. तर या मुद्यावरून आमदार सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा आक्रमक दिसले. याविषयी कॅबिनेटची बैठक घ्यावी. आपण याविषयी अगोदरच मुद्दा मांडला होता. पण त्यावर कारवाई झाली नसल्याचे सुधीरभाऊ म्हणाले.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now