टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Dinvishesh : जाणून घ्या १० जुलैचा इतिहास

Dinvishesh : आज भारतीय क्रिकेटचे लिटल मास्टर म्हणून ओळखले जाणारे सर्वोत्त फलंदाज सुनील गावसकर यांचा वाढदिवस आहे. कसोटी सामन्यात त्यांनी १० हजार धावांचा टप्पा गाठत आपल्या नावावर जगताली सर्वाधिक धावा करणारे पहिले फलंदाज म्हणून इतिहास रचला होता.

Dinvishesh

Dinvishesh : Sunil Gavaskar Birthday : आज, भारतीय क्रिकेटमधील दिग्गज आणि सर्वोत्तम फलंदाज सुनील गावसकर यांचा वाढदिवस आहे. १० जुलै १९४९ रोजी मुंबई येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा गाठून जगतील पहिले फलंदाज होण्याचा मान पटकवला होता. त्यांना लिटल मास्टर म्हणूनही ओळखले जाते. सुनील गावसकर यांनी ३४ कसोटी शतके झळकवत अनेक विक्रम रचले आहेत. वेगवान गोलंदाजांविरुद्ध निर्भीड फलंदाजी हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यांनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वा प्रभावशाली खेळांडूपैकी एक मानले जाते.आजही त्यांचे हजारो चाहते आहेत.

10 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1499 : पोर्तुगीज संशोधक ‘निकोलो कोएल्हो’, वास्को द गामाचा साथीदार, भारताचा सागरी मार्ग शोधून लिस्बनला परतला.
  • 1800 : कोलकाता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना.
  • 1850 : मिलार्ड फिलमोर युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष बनले.
  • 1890 : वायोमिंग अमेरिकेचे 44 वे राज्य बनले.
  • 1913 : डेथ व्हॅली, कॅलिफोर्नियामधील तापमान 134°F (57°C) पर्यंत पोहोचले, जे पृथ्वीवरील त्यावेळा पर्यंतचे सर्वाधिक तापमान आहे.
  • 1923 : मुसोलिनीने इटलीतील सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली.
  • 1925 : अवतार मेहेरबाबा यांनी मौनव्रत सुरू केले आणि मृत्यूपर्यंत सलग 44 वर्षे हे व्रत पाळले.
  • 1925 : टास या सोव्हिएत युनियन वृत्तसंस्थेची स्थापना झाली.
  • 1940 : ब्रिटनची लढाई म्हणून ओळखले जाणारे हवाई युद्ध सुरू झाले.
  • 1947 : मोहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल बनले.
  • 1962 : टेलस्टार-1 हा पहिला अमेरिकन संचार उपग्रह प्रक्षेपित झाला.
  • 1973 : युनायटेड किंगडमपासून बहामासचे स्वातंत्र्य.
  • 1973 : पाकिस्तानच्या संसदेने बांगलादेशला मान्यता दिली.
  • 1976 : सेवेसो, इटली येथे विषारी हवेची गळती.
  • 1978 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची मुंबईत स्थापना.
  • 1978 : मॉरिटानियामध्ये लष्करी उठाव.
  • 1991 : बोरिस येल्तसिन रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले.
  • 1992 : पनामाचे माजी राष्ट्राध्यक्ष मॅन्युएल नोरिगा यांना अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी 30 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
  • 1992 : आर्वी येथील विक्रम इनसॅट भू-केंद्र राष्ट्राला अर्पण केले.
  • 1992 : संपूर्ण स्वदेशी उपग्रह इनसॅट-2A, फ्रेंच गयानाच्या कौरो येथून प्रक्षेपित करण्यात आला.
  • 1995 : म्यानमारमधील लोकशाही चळवळीच्या नेत्या आंग सान स्यू की यांची 6 वर्षांच्या नजरकैदेतून बिनशर्त सुटका करण्यात आली.
  • 2000 : मनुभाई मेहता पुरस्कार शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर.
  • 2000 : नायजेरियामध्ये फुटलेल्या तेलाच्या पाइपलाइनचा स्फोट झाला, गळती होणारे तेल गोळा करण्याचा प्रयत्न करत असलेल्या 250 लोकांचा मृत्यू झाला.

10 जुलै रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

  • 1903 : ‘रा. भि. जोशी’ – साहित्यिक यांचा जन्म.
  • 1913 : ‘पद्मा गोळे’ – कवयित्री यांचा जन्म. (मृत्यू: 12 फेब्रुवारी 1998)
  • 1914 : ‘जो शस्टर’ – सुपरमॅन हिरो चे सहनिर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 30 जुलै 1992)
  • 1921 : ‘हार्वे बॉल’ – स्माईली चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 12 एप्रिल 2001)
  • 1923 : ‘जी. ए. कुलकर्णी’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कथालेखक यांचा जन्म. (मृत्यू: 11 डिसेंबर 1987)
  • 1934 : ‘डॉ. रजनीकांत आरोळे’ – पद्मभूषण विजेते जामखेड मॉडेल चे जनक यांचा जन्म.
  • 1940 : ‘लॉर्ड मेघनाद देसाई’ – अर्थशास्त्रज्ञ आणि इंग्लंडच्या हाऊस ऑफ लॉर्डस चे सभासद यांचा जन्म.
  • 1943 : ‘आर्थर अ‍ॅश’ – अमेरिकन टेनिस खेळाडू यांचा जन्म. (मृत्यू: 6 फेब्रुवारी 1993)
  • 1945 : ‘व्हर्जिनिया वेड’ – इंग्लिश टेनिस खेळाडू यांचा जन्म.
  • 1949 : ‘सुनील गावसकर’ – क्रिकेटपटू समालोचक यांचा जन्म.
  • 1950 : ‘बेगम परवीन सुलताना’ – पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका यांचा जन्म.
  • 1951 : ‘ राजनाथ सिंह’ – भारतीय राजकारणी व भारताचे 29 वे संरक्षण मंत्री यांचा जन्म.

10 जुलै रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1559 : ‘हेन्‍री (दुसरा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म: 31 मार्च 1519)
  • 1969 : ‘डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर’ – इतिहासकार यांचे निधन. (जन्म: 30 मे 1894)
  • 1970 : ‘ब्यार्नी बेनेडिक्ट्सन’ – आईसलँडचे पंतप्रधान यांचे निधन.
  • 1971 : ‘भिखारी ठाकूर’ – भोजपुरी भाषेचे शेक्सपिअर यांचे निधन. (जन्म: 18 डिसेंबर 1887)
  • 1989 : ‘प्रभाकर ऊर्ध्वरेषे’ – साम्यवादी विचारवंत साहित्यिक यांचे निधन.
  • 1995 : ‘डॉ. रामकृष्ण विष्णू केळकर’ – गरिबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध यांचे निधन.
  • 2000 : ‘वक्कम मजीद’ – भारतीय पत्रकार आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 20 डिसेंबर 1909)
  • 2005 : ‘जयवंत कुलकर्णी’ – पार्श्वगायक यांचे निधन. (जन्म: 31 ऑगस्ट 1931)
  • 2013 : ‘गोकुलानंद महापात्रा’ – भारतीय लेखक यांचे निधन. (जन्म: 21 मे 1922)
  • 2014 : ‘जोहरा सेहगल’ – भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 27 एप्रिल 1912)
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

भेसळखोरांना मृत्युदंडाची शिक्षा देणार? विधानसभेत प्रश्न; मंत्री नरहरी झिरवळांचे मोठे विधान

WhatsApp Update: मित्राचा वाढदिवस लक्षात ठेवण्याची चिंता मिटली! मेसेजिंग प्लॅटफॉर्म घेऊन येतंय बर्थडे रिमाइंडर फीचर, असं करणार काम

लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता, पण ८० लाख महिलांची होणार निराशा!

Gold- Silver Rate : सोन्यापाठोपाठ चांदीचीही गुड न्यूज, एकाच फटक्यात 1 किलो चांदी… पटापट जाणून घ्या

Gold Rate : सोन्याने झोप उडवली रे…10 ग्रॅमचा भाव पाहून भल्याभल्यांना फुटला घाम; किंमत थेट…

Omraje: श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले तिरुपती बालाजीचे देवदर्शन