टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

WhatsApp Update: मित्राचा वाढदिवस लक्षात ठेवण्याची चिंता मिटली! मेसेजिंग प्लॅटफॉर्म घेऊन येतंय बर्थडे रिमाइंडर फीचर, असं करणार काम

WhatsApp Birthday Reminder Feature: तुम्ही देखील सतत तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा वाढदिवस विसरता का? तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता व्हॉट्सॲप तुम्हाला तुमच्या मित्राच्या आणि मैत्रिणींच्या वाढदिवसाचा रिमाईंडर देणार आहे. हे फीचर कसं काम करणार, याबाबत आता जाणून घेऊया.

WhatsApp Update: मित्राचा वाढदिवस लक्षात ठेवण्याची चिंता मिटली! मेसेजिंग प्लॅटफॉर्म घेऊन येतंय बर्थडे रिमाइंडर फीचर, असं करणार काम

  • व्हॉट्सॲप लवकरच नवीन बर्थडे रिमाइंडर फीचर आणणार असून ते संपर्कांच्या वाढदिवसाची आठवण करून देईल.
  • हे फीचर सध्या व्हॉट्सॲप बीटा 2.26.27.3 (अँड्रॉईड) मध्ये चाचणीसाठी उपलब्ध असून निवडक बीटा यूजर्सना ते वापरता येत आहे.
  • वाढदिवसाचे रिमाइंडर तेव्हाच दिसणार आहेत, जेव्हा संबंधित यूजरने व्हॉट्सॲपवर त्यांची जन्मतारीख शेअर केलेली असेल.

मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला देखील तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा वाढदिवस लक्षात राहत नाही का? तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. व्हॉट्सॲप लवकरच एक नवीन फीचर घेऊन येत आहे. हे फीचर यूजर्सना फोनमध्ये सेव्ह केलेल्या संपर्काच्या वाढदिवसाचे रिमाइंडर देणार आहे. हे फीचर सध्या डेव्हलपमेंट टप्प्यात आहे. काही बीटा टेस्टर्ससाठी हे फीचर जारी करण्यात आले आहे. ज्या यूजर्सना त्यांच्या मित्रांचा किंवा मैत्रिणींचा वाढदिवस लक्षात राहत नाही, अशा यूजर्ससाठी नवीन फीचर अतिशय फायद्याचे ठरणार आहे.

या आगामी फीचरबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, ॲपवर या फीचरसाठी एक वेगळा सेक्शन दिला जाणार आहे. सध्या या सेक्शनची चाचणी सुरु आहे. यामध्ये तुमच्या फोनमध्ये सेव्ह करण्यात आलेल्या एखाद्या संपर्काचा वाढदिवस असेल तर तुम्हाला याबाबत रिमाईंडर दिले जाणार आहे. हे नवीन फीचर कसं काम करणार, याबाबत जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – AI Created) 

जाहिरात

 

कसं काम करणार व्हॉट्सॲपचे बर्थडे रिमाइंडर फीचर?

व्हॉट्सॲपच्या अपकमिंग फीचर्स आणि अपडेटवर नजर ठेवणारी वेबसाईट Wabetainfo ने शेअर केलेल्या माहितीनुसार, हे फीचर अँड्रॉईडवर व्हॉट्सॲप बीटा 2.26.27.3 अपडेटमध्ये लाईव्ह आहे. ॲपमध्ये एक वेगळे अपकमिंग बर्थडेचे सेक्शन दिसणार आहे. तसेच ज्या दिवशी एखाद्या संपर्काचा वाढदिवस असेल यूजरनाा ॲपमध्ये रिमाइंडर नोटिफिकेशन देखील मिळणार आहे.

सध्याच्या काळात आपल्या कुटूंबातील लोकांना, नातेवाईकांना, मित्रांना, मैत्रिणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपचा वापर केला जातो. शुभेच्छांचा मेसेज असो किंवा स्टेटस शेअर करणं असो, व्हॉट्सॲपचा सर्वत्र वापर केला जातो. यामुळे व्हॉट्सॲपचे नवे बर्थडे रिमाइंडर फीचर यूजर्ससाठी अतिशय फायद्याचे ठरणार आहे. हे एक सिंपल ओवरव्यूप्रमाणे काम करणार आहे. यासोबतच आता यूजर्सना मित्रांचा किंवा नातेवाईकांचा वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी ॲप किंवा कॅलेंडरची गरज असणार नाही.

लक्षात ठेवा की, व्हॉट्सॲपवर कोणत्याही यूजरच्या बर्थडेची नोटिफिकेशन तेव्हाच दिसणार आहे, जेव्हा त्या यूजरने व्हॉट्सॲपवर बर्थडे डिटेल शेअर केले असतील. अनेक देशांमध्ये कंपनी नवीन अकाऊंट तयार करण्याऱ्या यूजर्सचे वय व्हेरिफिकेशन करण्यासाठी बर्थडे डिटेल्स गोळा करते. अनेक देशांमध्ये हे गरजेचे नाही. त्यामुळे सर्वच यूजर्सना व्हॉट्सॲपवर डिटेल्स शेअर करावे लागत नाही.

व्हॉट्सॲप बर्थडे डेटाची प्रायव्हसी

सध्या व्हॉट्सॲपने बर्थडे डेटा प्रायव्हसीबाबत जास्त डिटेल्स किंवा सेटिंगबाबत जास्त माहिती शेअर केली नाही. अशी शक्यता आहे की, यूजरकडे कंट्रोल असणार आहे की, त्यांना त्यांचा बर्थडे प्लॅटफॉर्मवर इनेबल ठेवायचा आहे की नाही. नवीन अकाऊंट तयार करताना, स्थानिक कायद्यांचे पालन करण्यासाठी काही देशांमध्ये वयाची पडताळणी करण्याकरिता व्हॉट्सॲप जन्मतारखेची माहिती विचारते. सध्या या माहितीचा पुढील कशासाठीही वापर केला जात नव्हता. असे होऊ शकते की, व्हॉट्सॲप या फीचरसाठी यूजर्सच्या वाढदिवसाच्या माहितीचा वापर करेल.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now