श्री विठ्ठल मल्टीस्टेटचे चेअरमन दीपक बंदरे यांना महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड जाहीर

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सांगोला (प्रतिनिधी) – सांगोला येथील श्री विठ्ठल मल्टीस्टेटचे चेअरमन दीपक बंदरे यांना महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड जाहीर झाला आहे. दि. १ ऑगस्ट रोजी नाशिक येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
आपल्या स्वकर्तृत्वावर बँकिग क्षेत्रात यशस्वीतेकडे वाटचाल झालेली श्री विठ्ठल मल्टीस्टेट या संस्थेने चेअरमन दिपक बंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक क्षेत्रात एक चांगली घडी बसवली आहे. एकूण २५ शाखेद्वारे महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात उत्कृष्ट आर्थिक सेवा बजावत आहे. या सेवेचा गौरव म्हणून दि. १ ऑगस्ट रोजी नाशिक येथे रिसेल इन यांचे सौजन्याने हा पुरस्कार दिला जाणार आहे.

या पुरस्कार सोहळ्यासाठी अभिनेत्री प्राजक्ता माळी, डेप्युटी कमिशनर जी.एस.टी. समाधान महाजन, सकाळ मीडिया ग्रुप नाशिकचे विक्रांत मते, हेमंत राठी चेअरमन राम बंधू मसाले हे उपस्थित राहणार आहेत.

श्री विठ्ठल मल्टीस्टेट ही फायनानशिअल क्षेत्रात व विश्वासच्या जोरावर अतिशय चांगली सेवा पुरवत आहे. सोनेतारण कर्ज, महिला बचत गट कर्ज, मॉर्गेज लोन तसेच सरकारी नोकरदार कर्ज योजना चालू आहे. १२% वार्षिक व्याज दराने ठेवीवर आकर्षक व्याज देते तसेच १०० दिवसासाठी १०% योजना व इच्छापूर्ती ठेव योजना, मासिक ठेव योजना रिक्रिंग साठी विविध आकर्षक योजना यासाठी नावलौकिक आहे. तसेच एनईएफटी, आरटीजीएस, आय एम पी एस, मोबाईल बँकिंग देणारी व प्रत्यक्षपणे सुरळीत सेवा देणारी जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे.

सभासदांमध्ये आपल्या व्यवहारातून विश्वास निर्माण करण्यात यशस्वी झालेली आहे. प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, तत्पर सेवा याबाबतीत श्री विठ्ठल मल्टीस्टेट नावलौकिकास पात्र झाली आहे. एकूणच संस्थापक चेअरमन दीपक बंदरे यांनी केलेल्या अलौकिक कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत असून विविध मान्यवरांनी त्यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon