टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; माढा मतदारसंघात २१ नवीन पोस्ट ऑफिसेस मंजूर

On: April 10, 2026 10:36 AM
Follow Us:

सांगोला तालुक्यातील ‘वाणी चिंचाळे’ येथे नवीन पोस्ट ऑफिसचा शुभारंभ

सांगोला: माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मतदारसंघात एकूण २१ नवीन पोस्ट ऑफिसेसना मंजुरी मिळाली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ सांगोला तालुक्यातील वाणी चिंचाळे येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला.

ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंग, टपाल सेवा आणि शासकीय योजनांचा लाभ स्थानिक पातळीवर मिळावा, या उद्देशाने खासदारांनी हा विषय केंद्राकडे लावून धरला होता. या नवीन कार्यालयांमुळे ग्रामीण भागातील दळणवळण आणि आर्थिक व्यवहारांना मोठी गती मिळणार आहे.

या उद्घाटन समारंभाला सौ. डॉ. निकिताताई देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पंढरपूर डाक विभागाचे अधीक्षक मुन्ना कुमार यांनी टपाल विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी गावातील सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, राजकीय कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

वाणी चिंचाळे येथे पोस्ट ऑफिस सुरू झाल्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनसाठी किंवा सुकन्या समृद्धी सारख्या योजनांसाठी शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही. खासदारांच्या या कार्याबद्दल सांगोला तालुक्यातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.

“ग्रामीण भागाचा विकास हाच आमचा ध्यास आहे. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजना थेट सामान्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

— खासदार धैर्यशील मोहिते पाटील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सांगोल्यात पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाला लुटले! पाईपने मारहाण करत २ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास; सात जणांवर गुन्हा

सांगोला तालुक्यात घरफोड्यांची मालिका; चोरट्यांनी उडविला लाखोंचा ऐवज

कडलासजवळ फळांनी भरलेली पिकअप अडवून दरोडा; चालकास मारहाण, 6.70 लाखांचा ऐवज लंपास

कामाचा ताण आणि मानसिक दडपण: खिलारवाडी येथील शिक्षिकेचा मेंदूतील रक्तस्त्रावाने मृत्यू

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा