टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

PM Kisan Yojana: पीएम किसानचा 23 वा हप्ता अडकणार? महाराष्ट्रासह 14 राज्यातील शेतकऱ्यांनो, झटपट करा हे काम

Follow Us:

PM Kisan Yojana 23rd installment: पीएम किसानचा 23 वा हप्त्याची आता शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. पण त्यापूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्रासह 14 राज्यातील शेतकर्‍यांना ही अट पूर्ण करावी लागेल. त्याशिवाय त्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता जमा होणार नाही.

PM Kisan Yojana: पीएम किसानचा 23 वा हप्ता अडकणार? महाराष्ट्रासह 14 राज्यातील शेतकऱ्यांनो, झटपट करा हे काम
पीएम किसान योजना Image Credit source: एजन्सी
KALYAN DESHMUKH
KALYAN DESHMUKH | Updated on: Apr 11, 2026 | 11:04 AM
Share

Farmer ID ekyc: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 23 व्या हप्त्याची शेतकर्‍यांमध्ये प्रतिक्षा आहे. सरकार पीएम किसान योजनेत दरवर्षी 6,000 रुपये खात्यात जमा होतात. तीन टप्प्यात शेतकर्‍यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्यात येतात. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम ही थेट डीबीटी (DBT) पद्धतीने खात्यात जमा करण्यात येते. पुढील हप्ता जमा होण्यापूर्वी सरकारने एक मोठी अट पूर्ण करण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रासह 14 राज्यातील शेतकर्‍यांना या नियमाची पूर्तता करावी लागणार आहे. शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढावा लागणार आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला आहे. तर अद्याप अनेकांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्याशिवाय त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार नाही.

काय आहे Farmer ID?

बोगस शेतकऱ्यांची ओळख पटावी आणि बोगस लाभार्थ्यांना चाप बसावा यासाठी फार्मर आयडी असणे बंधनकारक करण्यात आले आहे. कृषी योजनांमध्ये बोगस लाभार्थी घुसू नये यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. सरकारी योजनांचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळतो याची माहिती समोर यावी यासाठी शेतकऱ्यांचे ओळखपत्र तयार करण्यात येत आहे. त्यालाच फार्मर आयडी असं म्हणतात. फार्मर आयडी हे जणू शेतकर्‍यांचे डिजिटल प्रोफाईल आहे. यामध्ये शेतकऱ्यांची सर्व माहिती जतन असते. शेतकर्‍यांची जमीन कुठे आणि किती आहे. त्याच्या शेतात सध्या कोणते पीक आहे यासह इतर माहिती यामध्ये जतन होते.

Farmer ID असे तयार करा

फार्मर आयडी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना AgriStack Portal वर जावे लागेल. या ठिकाणी पासवर्ड आणि युझर आयडी तयार करावा लागेल. ‘Create New User’ च्या पर्यायावर क्लिक करा. अटी आणि शर्तीचा फॉर्म सबमिट करा. यानंतर आधार कार्डशी लिंक मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करा. पुन्हा एकदा हिच प्रक्रिया पूर्ण करा. ओटीपीने व्हेरिफाय करा.

जुलै 2026 मध्ये 23 वा हप्ता

पीएम किसान योजनेचा हप्ता हा प्रत्येक चार महिन्यांनी जमा होतो. योजनेचा 22 वा हप्ता मार्च महिन्यात जमा झाला. चार महिन्यांच्या अंतराने हा 23 वा हप्ता जुलै 2026 मध्ये जमा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने हप्त्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. योजनेत हप्ता अगोदर जाहीर करण्यात येतो.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 08 जून 2026 | सोमवार

विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींचे कर्ज माफ होणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

Solar Storm Alert : सूर्यावरील प्रचंड स्फोटाचा आज पृथ्वीला तडाखा; भारतात ‘ऑरोरा’ दिसण्याची शक्यता, नासाकडून सतर्कतेच इशारा

विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर प्रहार

Horoscope Today 8th June 2026 : वाट पाहणं संपणार, आता सुखाचे दिवस येणार.. या राशींच्या नशिबाची किल्ली फिरली !