टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मोठी बातमी : सांगोला : ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

4 ग्रामपंचायतींसाठी 6 प्रभाग व 6 मतदान केंद्रे निश्चित

सांगोला :- सांगोला तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये सदस्य व थेट सरपंच यांचे निधन, राजीनामा किंवा अनर्हतेमुळे रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिसूचना दिनांक 30 मार्च 2026 रोजी पंचायत समिती कार्यालय, तलाठी कार्यालय तसेच संबंधित ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याची मुदत 7 एप्रिल ते 13 एप्रिल 2026 दरम्यान (11 व 12 एप्रिल सार्वजनिक सुट्टी वगळून) सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 या वेळेत तहसिल कार्यालय, सांगोला येथे निश्चित करण्यात आली आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता होणार असून उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत 17 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत आहे. निवडणूक लढविण्यात आल्यास मतदान 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडणार आहे.

या पोटनिवडणुकीत एकूण 4 ग्रामपंचायतींसाठी 6 प्रभाग व 6 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. अनकढाळ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाची थेट जनतेतून निवड होणार असून त्याचबरोबर 3 सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

तसेच खवासपूर, चिणके व चिकमहूद या ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी 1 सदस्य पदासाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 2 निवडणूक निर्णय अधिकारी व 4 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने संबंधित मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now