सांगोला ( प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेची विद्यार्थिनी कु.संस्कृती संतोष लोंढे (इयत्ता सातवी ) हिने प्रथम क्रमांक पटकाविला व शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
यामध्ये कु.संस्कृती हिने सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत ’निसर्गाप्रती माझे कर्तव्य’ या विषयावर आपली अभ्यासपूर्ण मांडणी केली.
या यशाबद्दल संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते कु.संस्कृती व पालक म्हणून उपस्थित आई अर्चना लोंढे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य अमोल गायकवाड, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद,प्रदीप धुकटे, मच्छिंद्र इंगोले व वांड़्मय मंडळातील शिक्षक उपस्थित होते
या स्पर्धेसाठी वाड़्मय मंडळ प्रमुख उन्मेष आटपाडीकर ,प्रशांत रायचुरे शैलजा झपके,उमेश नष्टे, अनिता घोंगडे,दत्तात्रय पाटील,संध्या तेली, श्रीकृष्ण वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके, उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
आणखी वाचा
क्रांतीज्योती महिला नागरी सहकारी पतसंस्थेकडून इफ्तार पार्टी
सांगोला येथे महाराष्ट्र सिंचन परिषदेचे आयोजन; ना.राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित राहणार