टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Jammu Kashmir : उरी हादरलं; LoC वर हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातील 2 जवान शहीद

On: June 10, 2026 2:28 PM
Follow Us:

Jammu Kashmir Uri Blast: उरीच्या कमलकोट सेक्टर इथं नियंत्रण रेषेनजीक झालेल्या स्फोटामुळं यंत्रणासुद्धा हादरल्या. नेमका कसा झाला हा स्फोट, ज्यामध्ये दोन जवान शहीद? जाणून घ्या घटनाक्रम…

Jammu Kashmir Uri Blast: देशाच्या सीमाभागात शेजारी राष्ट्रांकडून सुरू असणाऱ्या सर्व खुरापती पाहता त्या कारवाया परतवून लावण्यासाठी भारताचं लष्कर सज्ज आहे. मात्र याच लष्कराच्या कार्यवाहीदरम्यान जम्मू काश्मीरच्या उरी इथं, अशी घटना घडली ज्यामध्ये दोन जवान शहीद झाले. उरीच्या कमलकोट सेक्टर इथं असणाऱ्या नियंत्रण रेषेपाशी ही घटना घडली, जिथं हँड ग्रेनेडच्या अचानक झालेल्या स्फोटानं एकच खळबळ माजली. ही घटना त्यावेळी घडली जेव्हा हे जवान कर्तव्य बजावत होते. ग्रेनेडच्या भयंकर स्फोटानंतर जवान गंभीररित्या दुखापतग्रस्त झाले आणि त्यांना तातडीनं नजीकच्या रुग्णालयात नेम्यात आलं. डॉक्टरांनीसुद्धा जवानांचे प्राण वाचवण्यासाठी शिकस्त केली, मात्र त्यांना यामध्ये यश मिळालं नाही.

मृत सैनिकांची नावं अर्जुन जाधव आणि विक्रम बाळकृष्ण चव्हाण असून, त्यांना घटनेनंतर तातडीनं श्रीनगरच्या बादामीबाग छावणीस्थित लष्करी तळाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शहीद जाधव हे सातारच्या कराड येथील शाहपूर गावचे रहिवासी होते, तर शहीद चव्हाण हे नवी मुंबईच्या ऐरोलीचे रहिवासी होते अशी माहिती मिळत आहे.

 हे दोन्ही जवान लष्कराच्या 8 राष्ट्रीय रायफल्समध्ये सेवेत होते. हा स्फोट LoC वर असणाऱ्या अतिशय संवेदनशील क्षेत्रात झाला, जिथं लँडमाईन्स आणि इतर स्फोटकांचा साठा असल्यानं कायमच धोका असतो. दरम्यान या ठिकाणी हँड ग्रेनेडचा स्फोट नेमका कसा झाला याचा तपास सध्या यंत्रणा करत आहेत.

नियंत्रण रेषेवर अतिशय संवेदनशील वातावरण… 

जम्मू काश्मीर भागात असणाऱ्या 740 किमी अंतराच्या एलओसीचं क्षेत्र बारामुल्ला, कुपवाडा, बांदीपोरा या भागांमधून जातं. जम्मू क्षेत्रातील पुंछ, राजौरी इछूनही ही नियंत्रण रेषा दाते. इथंच 240 किमीचं क्षेत्र हे आंतरराष्ट्रीय सीमा असून, हे क्षेत्र सांबा, जम्मू आणि कठुआ या जिल्ह्यांतून पुढे जातं.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now