टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Devendra Fadnavis On Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना डावलले, देवेंद्र फडणवीस संतापले; मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पडसाद, नेमकं काय घडलं?

Devendra Fadnavis On Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांना नवी मुंबईतील कार्यक्रमात डावलण्यात आल्याचा मुद्दा मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित केला.

Devendra Fadnavis On Eknath ShindeDevendra Fadnavis On Eknath Shinde: नवी मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना निमंत्रण न दिल्यामुळे महायुतीमध्ये मोठा वाद निर्माण झाला. सिडको आणि अदानी एअरपोर्ट ऑथॉरिटीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात त्यांना डावलल्याने शिंदे गटात तीव्र नाराजी पसरली. याचे पडसाद काल (9 जून) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पडसाद उमटल्याचे दिसून आले.

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट आणि प्रताप सरनाईक यांच्यासह अन्य मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना नवी मुंबईतील कार्यक्रमात डावलण्यात आल्याचा मुद्दा मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित केला. मुख्यमंत्री कार्यालयावर आमचा आक्षेप नाही. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगेच स्पष्टीकरण दिलं. सदर प्रकरणी मी आधीच चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी सांगितली. तसेच अदानी समूह आणि सिडकोला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यास सांगितले. मी माझ्या कार्यालयालाही फोन केला आणि याबाबत विचारणा केली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नेमकं प्रकरण काय? (Devendra Fadnavis On Eknath Shinde)

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाची उभारणी ‘सिडको’च्या माध्यमातून झाली आहे. सिडको हा विभाग थेट नगरविकास मंत्रालयाच्या अंतर्गत येतो आणि एकनाथ शिंदे हे स्वतः नगरविकास मंत्री आहेत. 6 जून रोजी झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार आदिती तटकरे उपस्थित होत्या, मात्र एकनाथ शिंदे यांना निमंत्रणच देण्यात आले नव्हते. आपल्याच अखत्यारीत येणाऱ्या विभागाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमातून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्र्यांना दूर ठेवल्यामुळे शिंदे गटातील नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

एकनाथ शिंदे यांना जेवढं डावललं जाईल तेवढे ते लोकांच्या मनात शिरतील- बच्चू कडू (Bachchu Kadu On Eknath Shinde)

एकनाथ शिंदे यांना जेवढं डावललं जाईल तेवढे ते लोकांच्या मनात शिरतील. तुम्ही त्यांचं नाव पत्रिकेवर लिहा की नका लिहू एकनाथ शिंदे लोकांच्या मनातले नेते आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी दिली. 15 ते 20 दिवसांत आम्ही विदर्भात अनेक ठिकाणी पक्षासाठी दौरे केले, लोकांशी बोललो. चार दिवसांत मी विदर्भामध्ये 20 सभा केलेल्या आहे. मला खात्री आहे की हाच विदर्भ एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करेल, असं विधानही बच्चू कडू यांनी केलं. शिवसैनिकांनी आता शांत बसून चालणार नाही. शांत, सेवाभावी स्वभावाच्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करू…स्वबळावर की नाही, ते ठरले नाही. मात्र एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचंच आहे, असंही बच्चू कडू यावेली म्हणाले.

संबंधित बातमी:

विधान परिषदेसाठी घोडेबाजाराच्या चर्चा असताना नाशिकचे उमेदवार गोकुळ गीते यांचा ऑफरबद्दल धक्कादायक गौप्यस्फोट

Gold Price Today : सराफा बाजारात मोठा उलटफेर, सोन्याच्या किमती आज.. जाणून घ्या 10 ग्रॅमचे लेटेस्ट दर

 

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Maharashtra Rain Updates: वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार; मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह 30 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट, मान्सूनचे A टू Z अपडेट्स

Maharashtra School: राज्यातील शाळा कधी सुरु होणार, 15 जून की 22 जून? शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय

Sunetra Pawar : कारण आज अजितदादा आपल्यात नाहीत… सुनेत्रा पवार यांची भावूक पोस्ट, वर्धापन दिनाच्या निमित्ताने आवाहन काय?

विधान परिषदेसाठी घोडेबाजाराच्या चर्चा असताना नाशिकचे उमेदवार गोकुळ गीते यांचा ऑफरबद्दल धक्कादायक गौप्यस्फोट

Maharashtra Rain Updates: महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट

विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार