सांगोला:-पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधव जनकल्याणासाठी कडक उपवास करतात. ऋणानुबंध, सामाजिक सलोखा कायम रहावा यासाठी अनेक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते, प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात इफ्तारपार्टीचे आयोजन करण्यात येते. याच धर्तीवर क्रांतीज्योती महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने नुकतीच इफ्तार पार्टी आयोजीत करण्यात आली होती. सामाजिक बांधिलकी जोपासत इफ्तार पार्टी आयोजित केल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकार्यांचे कौतुक होत आहे.
क्रांतीज्योती महिला नागरी सहकारी पतसंस्थेकडून नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात. सामाजिक उपक्रमांतर्गत संस्थापक रामचंद्र उर्फ आर.ए.बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेकडून इफ्तार पार्टी आयोजित केल्यामुळे सामाजिक ऐक्य आणि सहकार्य वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
इफ्तार पार्टी प्रसंगी हाजी शब्बीर भाई खतीब, हाजी बशीर भाई तांबोळी , हाजी रफिक भाई तांबोळी, हाजी कमरुद्दीन खतीब, कलमोद्दीन मुल्ला, इब्राहिम मुल्ला, अलमगीर मुल्ला, अमजद बागवान, निहाल तांबोळी, सर्फराज तांबोळी, जमीर बागवान, सीए मणेरी, चंद्रकांत बनकर, अप्पा शिंदे ,तुषार बनकर, सोमनाथ माळी, राजू पोरे, कृष्णा गोडसे, योगेश बनकर यांच्यासह मुस्लिम बांधव, प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वाचे स्वागत व आभार संस्थापक रामचंद्र उर्फ आर.ए.बनकर यांनी मानले.इफ्तार पार्टी यशस्वी पार पाडण्यासाठी क्रांतीज्योती महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
आणखी वाचा
सांगोला येथे महाराष्ट्र सिंचन परिषदेचे आयोजन; ना.राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित राहणार
सांगोला तालुक्याच्यावतीने ना.जयकुमार गोरे यांचा उद्या भव्य नागरी सत्कार