टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सांगोला दापोली बसमुळे शेतकरी आणि पर्यटकांची सोय- दिपकआबा

On: April 14, 2026 7:16 PM
Follow Us:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सांगोला आगारातून सांगोला दापोली बसची सुरुवात  

सांगोला ;

सांगोला तालुक्यातील अनेक शेतकरी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करण्यासाठी मार्गदर्शन मिळावे म्हणून तसेच नवनवीन विकसित केलेली संकरित फळझाडे आणण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे जात असतात तसेच सांगोला तालुक्यातील हजारो पर्यटक कोकणात निसर्ग दर्शन घ्यायला जात असतात सांगोल्यातून दापोलीला जाणाऱ्या शेतकरी आणि पर्यटकांची सांगोला दापोली या नवीन बासमुळे चांगली सोय होईल असा विश्वास माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.

मंगळावर दि १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सांगोला आगारातून माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याहस्ते सांगोला ते दापोली ही नवीन बस सुरू करण्यात आली. या बसचे उद्घाटन प्रसंगी दिपकआबा बोलत होते. यावेळी भाजपचे शिवाजीराव गायकवाड, माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, सांगोला आगारप्रमुख विकास पोफळे, शहीद अशोक कामटे संघटनेचे अध्यक्ष निळकंठ शिंदे सह सर्व पदाधिकारी तसेच आगारातील अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते. यावेळी चालक आणि वाहनांचा सत्कार करण्यात आला.

पुढे बोलताना माजी आमदार दिपकआबा म्हणाले, सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे सांगोला तालुक्यातील शेतकरी हा कष्टाळू आणि प्रयोगशील बनला आहे. त्यामुळेच सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी डाळींब शेतीतून क्रांती केली. आज सांगोला तालुक्यात डाळींब द्राक्षे आंबा पेरू तसेच अन्य फळ पिकांच्या बागा दिमाखात उभ्या आहेत यामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली या कृषी विद्यापीठाचे महत्त्वाचे योगदान आहे. तसेच सांगोला तालुक्यातील पर्यटकांना नेहमीच कोकणचा नयनरम्य निसर्ग भुरळ घालत असतो त्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकरी आणि पर्यटकांचे दापोली आणि संपूर्ण कोकणाशी अतूट नाते निर्माण झाले आहे हेच नाते अधिक घट्ट आणि दृढ करण्यासाठी सांगोला आगाराने सुरू केलेली सांगोला दापोली ही बस निश्चितपणे मदत करेल असा विश्वास शेवटी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सांगोल्यात पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाला लुटले! पाईपने मारहाण करत २ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास; सात जणांवर गुन्हा

सांगोला तालुक्यात घरफोड्यांची मालिका; चोरट्यांनी उडविला लाखोंचा ऐवज

कडलासजवळ फळांनी भरलेली पिकअप अडवून दरोडा; चालकास मारहाण, 6.70 लाखांचा ऐवज लंपास

कामाचा ताण आणि मानसिक दडपण: खिलारवाडी येथील शिक्षिकेचा मेंदूतील रक्तस्त्रावाने मृत्यू

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा