सांगोला (प्रतिनिधी):- राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी पशुसंवर्धन व दुग्धविकास आणि मत्स्य विकास मंत्री महादेवजी जानकर यांचा शनिवार दि.25/4/2026 रोजी सायंकाळी 6 वाजता त्यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त सांगोला शहरातील मदने चौक (वंदे मातरम चौक) महुद रेल्वे गेट जवळ या ठिकाणी भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
उपेक्षित समाजातील माणूस अपेक्षित ठिकाणी पोहोचला पाहिजे. ही भूमिका केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्रातल्या घराणेशाहीच्या राजकारणात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करणारे महादेव जानकर हे राजकारणातील लढाऊ नेतृत्व मानले जातात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा वारसा जपणारे नेतृत्व यु आर नॉट डिमांडर यु आर कमांडर अशी रोखठोक भूमिका घेऊन अनेकांना आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष बनवण्याचे काम त्यांनी केले आहे.
महादेव जानकर यांना 58 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष व महादेव जानकर प्रेमी यांच्या संयुक्त विद्यमानाने 58 हजार रुपयांची थैली महादेव जानकर यांना भेट देण्यात येणार आहे.
तरी राष्ट्रीय समाज पक्षातील कार्यकर्त्यांनी व महादेव जानकर साहेब प्रेमी कार्यकर्त्यांनी या भव्य नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल (दादा) शेंडगे यांनी केले आहे.

















