सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालय सांगोल आणि स्मार्ट ब्रिज सोबत दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती उपप्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर यांनी दिली.
फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये सचिन मस्के यांचे काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागात द्वितीय व तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी “उद्योगातील सध्याच्या गरजा, कौशल्य विकास आणि करीअर संधी: या विषयावर विशेष संवाद सञाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचीउल्लेखनीय बाब म्हणजे, दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या करारा वर महाविद्यालयाच्या वतीने उपप्राचार्या डॉ. विद्याराणी क्षीरसागर यांनी स्वाक्षरी केली होती. या करारा अंतर्गत महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रम १० एप्रिल २०२६ रोजी या करारासंदर्भात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यात आला.
या कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील डाॅ. तृप्ती बनसोडे यांनी सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट (एसपीओसी) म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याशिवाय संगणक विभागप्रमुख डाॅ. तानाजी धायगुडे यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमास आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागाचे विभाग प्रमुख डाॅ. सोमनाथ ठिंगळे आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. धनंजय शिवपुजे उपस्थित होते.
दरम्यान संवाद सञांमध्ये महाविद्यालयाने राबविलेल्या अनुभवाधारित शिक्षण उपक्रमाचे विशेष कौतुक सचिन मस्के यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या सहभाग, प्रात्यक्षिक कौशल्ये व नवोन्मेषी दृष्टिकोनाचेही अभिनंदन केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न राहता प्रत्यक्ष उद्योगातील अनुभव मिळत असून त्यांच्या रोजगारक्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. तसेच भविष्यात अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, प्रकल्प व प्लेसमेंटच्या संधी अधिक उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
हा कार्यक्रम काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. तो यशस्वी करण्यासाठी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
















