अमेरिकेतील निकालांनंतर सोन्या-चांदीचे दर कमी होण्याची अपेक्षा असताना, दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सराफा बाजारात सोन्याने 700, तर चांदीने 1000 रुपयांची उसळी घेतली. जळगावसह राज्यातील बाजारात हे दर गगनाला भिडले असून, ऐन दिवाळी आणि लग्न सराईत ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

अमेरिकेत झालेल्या मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा पराभव झाल्याने शेअर मार्केटपासून सोन्या चांदीच्या बाजाराला दिलासा मिळले अशी चिन्हे होती. पण हा सर्व भ्रम फोल ठरताना दिसत आहे. ट्रम्प यांच्या पराभवानंतरही सोन्या चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी सुवर्ण बाजारात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. सोन्याच्या दरात तब्बल 700 रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 1 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. दिवाळी आणि ऐन लग्न सराईच्या काळात सोनं महागल्याने सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे.
राज्यातील सर्वात मोठं मार्केट असलेल्या जळगावच्या सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 700 रुपयांची तर चांदीच्या दरात 1 हजारांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 46 हजार 260 रुपये झाले आहेत. तर, चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 93 हजार 610 रुपये झाले आहेत. दिवाळीत देखील सोन्या चांदीच्या दरात चढउतार सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सामान्यांना मोठा झटका बसला आहे.

ऐन दिवाळीत फटका
दिवाळीत लोक मोठ्या प्रमाणावर सोनं चांदी खरेदी करत असतात. मात्र, ऐन दिवाळीतच सोन्याचे भाव रोज वाढत असल्याने सामान्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. तसेच लग्न सराईचे दिवस असल्यानेही सोने खरेदी करताना ग्राहकांना सतरावेळा विचार करावा लागणार आहे. उद्या रविवार आहे. रविवारच्या दिवशी मोठी खरेदी होत असते. त्याच्या आदल्याच दिवशी सोन्याचे भाव प्रचंड वाढल्याने सामान्यांचं कंबरडंच मोडलं आहे.
काल स्वस्त, आज महाग
काल धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं स्वस्त झालं होतं. काल 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,39,890 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीची किंमत सुमारे 1,80,080 रुपये प्रति किलोग्रॅम होती. मुंबई, दिल्लीसह बड्या शहरांमध्येही सोनं स्वस्त झालं होतं. पण आज पुन्हा एकदा सोनं महाग झालं आहे.
सोन्याचे कालचे भाव
दिल्ली- 1,39,390 रुपये प्रति 10 ग्रॅम
मुंबई- 1,39,640 रुपये प्रति 10 ग्रॅम
चेन्नई- 1,40,040 रुपये प्रति 10 ग्रॅम
कोलकाता- 1,39,450 रुपये प्रति 10 ग्रॅम
बंगळुरू- 1,38,750 रुपये प्रति 10 ग्रॅम
हैदराबाद- 1,39,860 रुपये प्रति 10 ग्रॅम






