
सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला तालुक्यातील देवळे गावचे सुपुत्र मोहन पांडुरंग सोनवले (वय 57) यांच्यावर काल शुक्रवार दि.13 जून रोजी शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अत्यसंस्कार करण्यात आले.मोहन पांडुरंग सोनवले यांना गुजरातमध्ये बीएसएफमध्ये असिस्टंट सबइन्स्पेक्टर म्हणून सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने विरमरण आले.
मोहन सोनवले यांना 11 जून रोजी सायंकाळच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने विरमरण आले. काल शुक्रवार दि.13 जून रोजी दुपारी 12.30 वाजणेच्या सुमारास मोहन पांडुरंग सोनवल यांचे पार्थिव सैन्य दलाच्या ताफ्याबरोबर त्यांचे मूळ गावी देवळे येथे आण्ण्यात आले होते. त्यानंतर देवळे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर पार्थिव फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून अंत्ययात्रा काढत स्मशानभूमीत आणण्यात आले. यावेळी अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहेच्या घोषणा देत जवान मोहन सोनवले यांची जड अंतःकरणाने शोकाकुल वातावरणात गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. त्यानंतर वीर जवान मोहन सोनवले यांना मुखाग्नी देण्यात आला.

यावेळी आ.डॉ.बाबासाहेब देशमुख, सागर पाटील, शिवाजीराव व्हनमाने, गिरीष गंगथडे, तानाजी चंदनशिवे, बापूसाहेब ठोकळे , कॅप्टन संभाजी मागाडे, डीवायएसपी विक्रांत गायकवाड,तहसीलदार संतोष कणसे,पो.नि.विनोद घुगे, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, सैन्य दलातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, देवळे ग्रामस्थ,जयजवान माजी सैनिक सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी े उपस्थित होते.
मोहन सोनवले हे सध्या गुजरात मध्ये पालमपूर जिल्ह्यात धंतेवाडी येथे बीएसएफ मध्ये असिस्टंट सबइन्स्पेक्टर म्हणून सेवा बजावत होते. यापुर्वी त्यांनी जम्मू काश्मिर, आसाम, त्रिपुरा, बंगाल, राजस्थान मध्ये सेवा 36 वर्षे सेवा बजाविली असून त्यांच्या पश्चात आई, 3 भाऊ, पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी असा परिवार आहे.












