T20 विश्वचषकात भारताचा दुसरा सामना नेदरलँड्ससोबत सिडनी येथे होणार आहे. आज होणाऱ्या या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. पावसामुळे या सामन्यावर परिणाम झाला तर काही षटकेही कापली जाऊ शकतात.
टीम इंडियाने याआधी पाकिस्तानचा रोमहर्षक सामन्यात पराभव केला होता. हवामान खात्याने सांगितले आहे की भारत आणि नेदरलँड यांच्यातील सामन्यापूर्वी पाऊस पडू शकतो.
मात्र त्यानंतर पाऊस थांबू शकतो. सध्या सिडनीच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, भारताच्या वेळेनुसार सकाळी ७.३० वाजता पाऊस पडला. त्यामुळे नाणेफेकीपूर्वी किंवा नंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामन्यावर परिणाम होऊ शकतो.