India Vs Pakistan क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची शानदार शैलीत विजयी वाटचाल सुरू आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने काल दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी पराभव केला आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला.
या विजयासह टीम इंडियाने पॉइंट्स टेबलमध्ये अव्वलस्थान निश्चित केले आहे.
India Vs Pakistan
यासह, ते सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील, जिथे ते पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाशी स्पर्धा करतील. यावेळी असे झालेच तर, नंबर चार हा पाकिस्तानचा संघ असू शकतो. पण असे होणे फार कठीण वाटत आहे.
वर्ल्ड कपमध्ये सध्याच्या परिस्थितीत न्यूझीलंडचा संघ चौथ्या क्रमांकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. त्यानंतर पाकिस्तानचा दावा आहे. दोघांचे आठ सामन्यांत समान आठ गुण आहेत. पण न्यूझीलंड संघ नेट रनरेटमध्ये खूप पुढे आहे. न्यूझीलंडला 9 नोव्हेंबरला बंगळुरूमध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा ग्रुप सामना खेळायचा आहे.
न्यूझीलंडने हा सामना गमावल्यास पाकिस्तानच्या अपेक्षा वाढतील. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला इंग्लंडविरुद्ध 11 नोव्हेंबर रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर शेवटचा ग्रुप सामना खेळायचा आहे. दरम्यान बंगळुरूमध्ये पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जर न्यूझीलंड-श्रीलंका सामना पावसामुळे रद्द झाला तर, दोघांचे एक -एक गुण समान होतील. तरीही पाकिस्तानचा फायदा होईल.
इथे हि वाचा
मोठी बातमी! शिंदे अपात्र झाल्यास काय?
सोलापुरातील या कुटुंबाने घेतली सिने सुपर स्टार अमिताभ बच्चन यांची भेट
सोलापुरातील रंगभवन चर्च समोरिल फर्नीचर दुकानांना भीषण आग ; अनेक दुकाने जळून खाक