टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Gold Price Today : सोन्याची मोठी घसरण, भाव डायरेक्ट 1.50 लाखांखाली… तुमच्या शहरात किती आहेत दर ? जाणून घ्या एका क्लिकवर

On: June 11, 2026 10:06 AM
Follow Us:

Gold Price Today 11 June 2026 Latest News Updates in Marathi : विश्लेषकांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल 90 डॉलर्सच्या वर गेली. यामुळे डॉलर मजबूत झाला आणि मौल्यवान धातूंच्या किमतीत घट झाली. आज भारतातील प्रमुख शहरात, तुमच्या गावात सोन्याचे भाव किती, घ्या जाणून..

Gold Price Today : सोन्याची मोठी घसरण, भाव डायरेक्ट 1.50 लाखांखाली... तुमच्या शहरात किती आहेत दर ? जाणून घ्या एका क्लिकवर

सोने-चांदी विकत घेण्यास उत्सुक असणाऱ्या ग्राहकांसाठी हा गुरूवार खुशखबर घेऊन आला आहे. देशभरात सोन्याच्या किमतीत पुन्हा घट झाल्याचे दिसून आले आहे. गुरूवार, 11 जूनच्या सकाळी देशातील बहुतांश शहरात सोनं स्वस्त झाल्याचं दिसून आलंय. देशाची राजधानी दिल्लीमध्ये 24-कॅरेट सोन्याचा भाव 1.50 लाखांच्या खाली आला आहे. प्रति 10 ग्रॅम सोन्याचे दर 1 लाख 49 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ आणि अमेरिकन डॉलरचे बळकटीकरण यामुळे सोन्याची मागणी मंदावली आहे, परिणामी भाव पडल्याचे दिसून आले. याआधीच्या दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9% शुद्ध सोन्याचा भाव 4300 रुपयांनी घसरला होता . सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट गोल्ड’चा भाव प्रति औंस 4.168.99 डॉलर्स इतका आहे.

विश्लेषकांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे ‘ब्रेंट क्रूड ऑइल’च्या (कच्च्या तेलाच्या) किमती प्रति बॅरल 90 डॉलर्सच्या वर गेल्या आहेत. यामुळे डॉलर मजबूत झाला असून मौल्यवान धातूंच्या किमतीत घट झाली आहे. सध्या ब्रेंट क्रूडसाठी प्रति बॅरल 94 डॉलर्सवर इतका दर मोजावा लागत आहे आहे. ऊर्जेच्या किमतींमधील या वाढीमुळे महागाई आणि व्याजदर दीर्घकाळापर्यंत उच्च पातळीवर राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे सोने आणि चांदीचे आकर्षण कमी झाले आहे. परिणामी दर कमी झाले आहेत.

देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर किती ?

दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,49,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर 22 कॅरेटचा भाव 1,36,590 रुपये इतका आहे. मुंबई आणि कोलकाता येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 1,36,440 रुपये तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,48,850 रुपये प्रति 10 ग्राम आहे.

चेन्नईमध्ये 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्यासाठी 1,50,540 रुपये तर 22 कॅरेट सोन्यासाठी 1,37,990 रुपये मोजावे लागतील. तर पुणे आणि बंगळुरूमध्ये 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं 1,48,850 रुपयांना आणि 22 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं 1,36,440 रुपयांना मिळतंय.

शहर 22 कॅरेट सोन्याचा आजचा दर (₹) 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर (₹)
दिल्ली 136590 149000
मुंबई 136440 148850
अहमदाबाद 136490 148900
चेन्नई 137990 150540
कोलकाता 136440 148850
हैदराबाद 136440 148850
जयपुर 136590 149000
भोपाळ 136490 148900
लखनऊ 136590 149000
चंदीगड 136590 149000

चांदीचे दर

ग्राहकांसाठी आणखी एक खुशखबर म्हणजे सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही घट झाली आहे. 11 जूनच्या सकाळी चांदीचा दर प्रति किलो 2, 49,900 इतका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट सिल्व्हर’चा (तात्काळ व्यवहारासाठीची चांदी) व्यापार प्रति औंस 63.87 डॉलर्स या दराने होत आहे. सोने आणि चांदीचे देशांतर्गत दर हे देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही घटकांमुळे प्रभावित होतात.

हे सुद्धा वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now