टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Rohit Pawar On Ajit Pawar : अजितदादांच्या अपघातामागील लोकांना वाचवणारा मफलरवाला नेता कोण? 16 तारखेला राजकीय बॉम्ब फुटणार? रोहित पवार पत्रकार परिषदेत कोणता खुलासा करणार?

On: November 14, 2026 1:26 PM
Follow Us:

Rohit Pawar On Ajit Pawar : “अजितदादांच्या अपघात / घातपातामागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण?” असा थेट प्रश्न या पोस्टरमधून विचारण्यात आला आहे.

पुणे : अजित पवार यांच्या अपघातामागे घातपात असल्याचा संशय आणि या प्रकरणातील काहींना वाचवलं जात असल्याचा दावा गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar On Ajit Pawar) करत आहेत. अशातच त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले असून याची सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. “अजितदादांच्या अपघात / घातपातामागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण?” असा थेट प्रश्न या पोस्टरमधून विचारण्यात आला आहे. (Rohit Pawar On Ajit Pawar)

विशेष म्हणजे या पोस्टरवर कुणाच्याही नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही, मात्र त्यावर एका मफलरची प्रतिकृती छापण्यात आली आहे. या पोस्टरच्या माध्यमातून 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे नेमकं काय घडणार आणि कोणता राजकीय बॉम्ब फुटणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (Rohit Pawar On Ajit Pawar)

यापूर्वी देखील रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघात प्रकरणी ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनीला वाचवणारा ‘मफलरवाला नेता’ कोण, असा सवाल उपस्थित केला होता. त्यावेळी हा नेता अरविंद केजरीवाल किंवा छगन भुजबळ नसून दुसराच कोणीतरी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. तसेच, 10 ऑक्टोबर रोजी या नेत्याचे नाव जाहीर करून पर्दाफाश करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता. (Rohit Pawar On Ajit Pawar)

 

रोहित पवार यांच्या याच जुन्या वक्तव्याचा संदर्भ घेत आता 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेत कोण नवीन गौप्यस्फोट करणार, हे पाहणंही महत्त्वाचं राहणार आहे. रोहित पवारांनी शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत भाष्य करण्यात आले आहे. त्यांच्या मृत्यूनंतर अद्यापही काही प्रश्न अनुत्तरित असल्याचा दावा करत, या अपघातामागील सूत्रधारांना पाठीशी घालणारा नेता नेमका कोण, अशी विचारणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पोस्टरवर एका मफलरचे चित्र छापण्यात आले असून, यामुळे एका विशिष्ट नेत्याकडे निशाणा साधला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. येत्या 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता कोणता ‘राजकीय बॉम्ब’ फुटणार, असा उल्लेखही या पोस्टरमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे आता मफलरवाला नेता कोण आणि यामागे नेमके कोण आहे, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

१६ तारखेला रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात आणखी काय खुलासा करणार आणि अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत कोणती नवीन माहिती उघड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मफलर घातलेल्या व्यक्तीच्या चित्रातून कोणाला लक्ष्य करण्यात आले आहे, याचे उत्तरही आता 16 नोव्हेंबरलाच मिळण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now