टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

बिग बॉस 20 मध्ये मोठा ट्विस्ट!

On: September 27, 2026 11:17 PM
Follow Us:

बिग बॉस 20’च्या तिसऱ्या आठवड्यात मोठा एलिमिनेशन ट्विस्ट पाहायला मिळाला. ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने ईशा रिखीच्या घराबाहेर जाण्याची घोषणा केली. ईशा आणि रॅपर यंग डीएसए हे या आठवड्यात एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले होते.

प्रेक्षकांच्या मतदानाच्या आधारे झालेल्या या एलिमिनेशनमध्ये यंग डीएसएला ईशापेक्षा अधिक मते मिळाल्याचे समोर आले. त्यामुळे अवघ्या 21 दिवसांचा प्रवास केल्यानंतर ईशाला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले.

सलमान खानने यंग डीएसएला आधी बाहेर जाणार असल्याचे सांगत काही क्षणांसाठी घरातील सदस्यांमध्ये संभ्रम निर्माण केला. त्यानंतर प्रत्यक्षात ईशा रिखी शोमधून बाहेर जात असल्याचे जाहीर करण्यात आले. ईशाच्या एक्झिटनंतर आता बिग बॉस 20 मधील स्पर्धा आणखी रंगण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now