मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पुन्हा एकदा एकत्र दिसल्याने त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये मलायका कारमध्ये बसल्यानंतर अर्जुन तिच्यासाठी कारचा दरवाजा बंद करताना दिसत आहे. त्यानंतर अर्जुनही कारच्या दुसऱ्या बाजूने आत बसताना दिसतो. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांकडून दोघांच्या पॅचअपबाबत अंदाज व्यक्त केले जात आहेत. मात्र, मलायका आणि अर्जुन यांनी पुन्हा नात्यात आल्याची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
मलायका आणि अर्जुन जवळपास सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. 2024 मध्ये अर्जुनने एका कार्यक्रमात स्वतःला सिंगल असल्याचं सांगितल्यानंतर त्यांच्या ब्रेकअपची पुष्टी झाली होती. मात्र, ब्रेकअपनंतरही दोघांमध्ये कटुता नसल्याचं अनेक प्रसंगी दिसून आलं आहे.
यापूर्वीही दोघे सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले आहेत. त्यामुळे सध्याच्या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली असली, तरी पॅचअप झाल्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.










