सांगोला (प्रतिनिधी):- सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे महाविद्यालयाने नुकतेच कॅम्पस रिकरुटमेन्ट ड्राईव्हचे आयोजन केले होते.या पूल रिकरुटमेन्ट कॅम्पस मध्ये दोन नामांकित फार्मा कंपन्यांनी भाग घेतला त्यामध्ये रिलायन्स फार्मा पीव्हीटी.एलटीडी मुंबई, एजिओ फार्मासुटिकल पुणे यांचा समावेश होता. त्यामधून सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे महाविद्यालयाचे तब्बल 41 विद्यार्थ्यांची तर सहभागी इतर 8 फार्मसी कॉलेजच्या 105 विद्यार्थ्यांची निवड वरील 2 नामांकित फार्मा कंपन्यांमध्ये झाली आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले यांनी दिली.
या कॅम्पस रिकरुटमेन्ट ड्राईव्ह कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.विश्वनाथ पाटोळे, एचआर एजीवो फार्मासुटिकल पुणे, श्री.गोपाळ आवळे, एचआर रिलायन्स फार्मासुटिकल,मुंबई, श्री.संतोष स्वामी, अद्वित सर्विसेस प्रशिक्षण मार्गदर्शक पुणे, निर्माण संस्थेचे श्री.राहुल आरे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांच्या हस्ते सरस्वतीमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाले.पाहुण्यांचे मनोगत झाल्यानंतर मुलाखतीस सुरवात झाली. पात्र 200 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. प्रोडक्शन एझीकुटीव्ह, क्वालिटीअशुरन्स एझीकुटीव्ह व इतर पदाकरिता या विद्यार्थ्यांची निवड झाली. मुलाखतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाची प्रस्थावना डॉ.स्वप्नील मोरे यांनी तर पाहुण्यांची ओळख डॉ.औदुंबर माळी यांनी केली.हे कॅम्पस रिकरुटमेन्ट ड्राईव्ह यशस्वी करण्यासाठी कॉलेज ट्रैनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा.एस.एस.काळे व प्रा.एस.पी.जोकार यांचे योगदान लाभले.












