टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सांगोला वकील मारहाण प्रकरणात ॲड. उज्ज्वल निकम यांची एन्ट्री

On: April 6, 2026 10:49 AM
Follow Us:

ॲड. उज्ज्वल निकम घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट 

सांगोला :

संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या सांगोला येथील वकील मारहाण प्रकरणात आता राज्याचे विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची एन्ट्री झाली आहे. सांगोला येथील ॲड. सागर मेटकरी यांना मारहाण करणाऱ्या पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी ॲड. उज्ज्वल निकम आता थेट राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती करणार असल्याची माहिती सांगोला बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. विशालदीप बाबर यांनी दिली.

सांगोला बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड विशालदीप बाबर यांनी सांगोला येथील ॲड. सागर मेटकरी यांना पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी केलेल्या मारहाणीबाबत राज्याचे विशेष सरकारी वकील ॲड उज्ज्वल निकम यांना सांगितले यावर ॲड उज्ज्वल निकम यांनी सांगोला बार कौन्सिलने पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्याबाबत जी भूमिका घेतली आहे त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहू आणि वकिलावर हात उचलणाऱ्या विनोद घुगे या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी आपण तत्काळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ आणि राज्याच्या गृह विभागाला याबाबत विनंती करू असे वचन ॲड उज्ज्वल निकम यांनी मारहाण झालेले ॲड सागर मेटकरी आणि सांगोला बार कौन्सिलला दिले.

दरम्यान पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी ॲड सागर मेटकरी यांना मारहाण केल्यानंतर या घटनेचे संपूर्ण राज्यभर पडसाद उमटत असून या घटनेचा राज्यभरातील अनेक वकील संघटनांनी निषेध व्यक्त करून सांगोला बार कौन्सिलला आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड मिलिंद थोबडे यांच्यानंतर आता या प्रकरणात थेट राज्याचे विशेष सरकारी वकील ॲड उज्ज्वल निकम यांनी लक्ष घातल्याने या प्रकरणी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्यावर कोणती कारवाई होणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सांगोल्यात पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाला लुटले! पाईपने मारहाण करत २ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास; सात जणांवर गुन्हा

सांगोला तालुक्यात घरफोड्यांची मालिका; चोरट्यांनी उडविला लाखोंचा ऐवज

कडलासजवळ फळांनी भरलेली पिकअप अडवून दरोडा; चालकास मारहाण, 6.70 लाखांचा ऐवज लंपास

कामाचा ताण आणि मानसिक दडपण: खिलारवाडी येथील शिक्षिकेचा मेंदूतील रक्तस्त्रावाने मृत्यू

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा