टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

महाराष्ट्र पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर अभिजीत दीपके संतापले; म्हणाले, “आमचं हार्ट ब्रेक केलं”

On: October 6, 2026 1:38 PM
Follow Us:

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी महाराष्ट्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना बजावलेल्या नोटिसांवरून नाराजी व्यक्त केली आहे. 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनाची घोषणा करण्यात आली असून, या आंदोलनासाठी दिल्लीला जाऊ नये यासाठी काही कार्यकर्त्यांना चंद्रपूर पोलिसांकडून नोटिसा देण्यात आल्याचा दावा दीपके यांनी केला.

दीपके यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांच्या नोटिसमध्ये आंदोलन हिंसक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यावर त्यांनी सवाल उपस्थित करत, आंदोलन होण्याआधीच ते हिंसक होणार असल्याचे पोलिसांना कसे कळले, असा प्रश्न केला.

“महाराष्ट्र पोलिसांनी आमचं हार्ट ब्रेक केलं. आम्ही नेहमी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांबद्दल बोलतो. मग आमच्या आंदोलनाला हिंसक का समजलं जात आहे?” असा सवाल दीपके यांनी केला.

तसेच, चंद्रपूरहून दिल्लीला जाण्यासाठी लागणाऱ्या खर्चाबाबत पोलिसांनी प्रश्न उपस्थित केल्याचेही त्यांनी सांगितले. जंतर-मंतरवर होणारे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचा दावा त्यांनी केला.

महाराष्ट्र पोलिसांनी अशा प्रकारच्या नोटिसा देऊन कार्यकर्त्यांवर दबाव आणू नये, अशी भूमिका दीपके यांनी मांडली. “जंतर-मंतर चंद्रपूर पोलिसांच्या अखत्यारीत कधी आलं?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

यासोबतच, आंदोलन करणारे विद्यार्थी किंवा कार्यकर्ते आदिवासी समाजातील असल्यामुळे त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोपही दीपके यांनी केला. आमदार-खासदारांची मुलं आंदोलनात असती तर अशीच कारवाई झाली असती का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, CJPकडून 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना बजावण्यात आलेल्या नोटिसांवरून वाद निर्माण झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now