टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

NCP Merger: आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी पुण्यातील जिजाई बंगल्यावर ‘त्या’ 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु

On: November 13, 2026 11:14 AM
Follow Us:

NCP Merger Parth Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, पार्थ पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, पुण्यात नेमकं काय घडतंय?

NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या हालचालींना सध्या प्रचंड वेग आला आहे. शरद पवार गट आणि अजितदादा गट दोन्ही बाजूचे नेते एकमेकांशी चर्चा करुन विलिनीकरणाचा मसुदा व अटी-शर्ती ठरवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, या सगळ्यात संजय राऊत यांच्या एका वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीत परस्परांविषयी संशयाचे वातावरण निर्माण होईल, असा प्रकार घडला आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या पक्षाचे 20 ते 22 आमदार पक्षातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहेत. ते शरद पवार साहेबांना भेटत आहे, ते फक्त गप्पा मारायला नाही, असे राऊत यांनी म्हटले होते. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना फोन येत असल्याची माहिती समोर आली होती. विलिनीकरणाबाबत तुमची भूमिका काय आहे, शरद पवार गटाकडून तुम्हाला फोन आला होता का, असे प्रश्न या आमदारांना विचारण्यात आल्याची माहिती आहे. (NCP Merger)

एकीकडे संजय राऊतांचे वक्तव्य आणि दुसरीकडे शरद पवार गटातील काही आमदारांनी स्वतंत्र गट म्हणून एनडीएसोबत जाण्याचा प्रस्ताव मांडणे, रोहित पवारांचा विलिनीकरणाला असणारा विरोध, या सगळ्या घडामोडींमुळे सुनेत्रा पवार यांच्या पक्षात सध्या चलबिचल सुरु आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे सावध झाल्याची चर्चा आहे. सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना फोन गेल्यानंतर आता पार्थ पवार हेदेखील सक्रिय झाल्याची माहिती समोर येत आहे.

पुण्यात पार्थ पवारांच्या (Parth Pawar) उपस्थितीत शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि ठराविक आमदारांची बैठक होत आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार जिजाई बंगल्यावर पोहोचल्याची माहिती आहे. नुकतेच भोरचे आमदार शंकर मांडेकर बैठकीसाठी पोहचले. पार्थ पवार यांनी इतक्या तातडीने ही बैठक का बोलावली आणि या बैठकीला ठराविक आमदारांनाच का बोलावले, याविषयी राजकीय वर्तुळात निरनिराळे तर्क लढवले जात आहेत. त्यामुळे पुढील काही तासांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेबाबत महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

NCP Merger talks: राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते दिल्लीत, भेटीगाठींची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेने जोर धरला असताना शरद पवार गट आणि अजितदादा गटाचे प्रमुख नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे आज संसदीय समितीच्या बैठकीसाठी दिल्लीत  आहेत. खासदार सुनील तटकरे पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहेत. तर सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल वित्तीय समितीचे सदस्य आहेत. सकाळी 11.30 पासून दिल्लीत बैठका पार पडणार आहेत. या दरम्यान राष्ट्रवादीचे हे नेते एकमेकांना भेटणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Heavy Rain Alert : वारं फिरलं, आता थेट 10 दिवस तडाखेबाज पाऊस, 184 KM ताशी…

Mudra Loan: विना हमी 20 लाखांचं कर्ज मिळणार, मोदी सरकारचा योजनेत मोठा बदल, काय आहे अपडेट?

MahaLab Issue Bhandara: महायुती सरकारने बिलं थकवली, राज्यातील मोफत ‘महालॅब’ रक्त चाचण्या बंद, गरोदर माता आणि वृद्धांचे हाल

Tukaram Mundhe on Milk and Ghee: तुकाराम मुंढेंनी सांगितलं कोणतं दूध विकत घ्या, कच्च्या आणि सुट्या दुधातील महत्त्वाचा फरक व तापमानाचं गणित समजावून सांगितलं?

अखेर मुंबईने हार्दिकला सोडलं, पंजाबचा मोहरा अर्शदीप सिंग पलटनच्या हाती, किती कोटींची डील?

Ravindra Dhagekar and Chandrakant Patil: अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल