टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मा.आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते सांगोला शहरात उद्या कोट्यवधी रूपयांच्या विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन

Follow Us:

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला नगरपरिषद हद्दीतील विविध योजनांतर्गत सन 2025-26 या वर्षात मंजूर झालेल्या सुमारे 8 कोटींहून अधिक निधीच्या विकासकामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा उद्या शनिवार दि.18 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

सांगोला विधानसभेचे माजी आमदार अ‍ॅड.शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष श्री.आनंदा माने असणार आहेत. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून विधानसभा सदस्य डॉ.बाबासाहेब देशमुख, विधान परिषद माजी सदस्य श्री.दीपकआबा साळुंखे-पाटील आणि माजी नगराध्यक्ष श्री.रफिकभाई नदाफ उपस्थित राहणार आहेत.

सांगोला शहराच्या वैभवात भर घालणार्‍या आणि नागरिकांची सोय करणार्‍या या विकासकामांच्या सोहळ्याला सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सांगोला नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

उद्घाटन होणारी कामे

  1. आठवडा बाजार येथील मटन मार्केट फेज-2 विकसित करणे (1.50 कोटी).
  2. देशमुख वस्ती सांगोला-पंढरपूर रोड ते बाळासाहेब बनसोडे घर ते कॅनॉल लगत आप्पासाहेब देशमुख घर ते नगरपरिषद हद्दीपर्यंत रस्ता करणे (1.0 कोटी).
  3. मोहन राऊत घर ते बायपास रस्त्यापर्यंत रस्ता खडीकरण व ओढ्यावर सीडी वर्क बांधणे (1.75 कोटी).
  4. चिंचोली रोड स.नं.515 ते पुर्वेस फॅबटेक कॉलेज कडे जाणारा 9 मी.रूंदीचा डी.पी.रस्ता तयार करणे. (73 लाख)
  5. * चिंचोली रोड येथील 9.मी. डी.पी.रोड सर्व्हे नं.516 व 517 मधील रस्ता डांबरीकरण करणे. (47 लाख)
  6. चिंचोली रोड येथील 9.मी.डी.पी. रस्ता ते सर्व्हे नं.555 ते फॅबटेक इंजिनिअरींग कॉलेज पर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. (1 कोटी)

     

  7. अयोध्या नगरी येथे सांस्कृतिक सभागृह बांधणे व परिसर सुशोभीकरण (59 लाख).
  8. सिद्धिविनायक हाउसिंग सोसायटी येथील खुली जागा विकसित करणे (50 लाख).


भूमिपूजन होणारी कामे

  1. चांडोेलेवाडी-शेंबडेवस्ती येथील अंतर्गत रस्ते विकसित करणे (1.50 कोटी).
  2. मिरज रोड लक्ष्मीनगर येथे अंतर्गत रस्ते करणे (34.28 लाख).
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now