टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सायकलवरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची मशाल; सांगोला तालुक्यातील भीमसैनिकाचा अनोखा उपक्रम

On: April 14, 2026 11:13 AM
Follow Us:

सांगोला (प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील वझरे येथील भीमसैनिक भिकू सुखदेव धांडोरे यांनी एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम हाती घेतला आहे. स्वतःच्या सायकलवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो, माईकची व्यवस्था व बाबासाहेबांची गाणी लावून ते गावोगावी फिरत विचारप्रबोधन करत आहेत.

चोपडी, बलवडी, नाझरे, चिनके आदी गावांमध्ये फिरून धांडोरे हे नागरिकांपर्यंत बाबासाहेबांचे विचार पोहोचवत आहेत. कोणताही दिखावा किंवा प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता ते समाजजागृतीचे कार्य करत असल्याने त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्येक घरापर्यंत पोहचले पाहिजेत, हा एकमेव ध्यास घेऊन ते ही विचारयात्रा करत आहेत. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर विचार मांडणे सोपे असले तरी प्रत्यक्ष गावोगावी जाऊन जनजागृती करणे ही मोठी गोष्ट आहे. हीच जबाबदारी धांडोरे यांनी खांद्यावर घेतली आहे.

त्यांच्या सायकलचा प्रत्येक फेरा हा परिवर्तनाचा संदेश देणारा ठरत असून, अशा भीमसैनिकांमुळेच बाबासाहेबांचे विचार खर्‍या अर्थाने समाजात रुजत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या उपक्रमाबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त होत असून, धांडोरे यांच्या कार्याला सर्वत्र सलाम केला जातोय.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सांगोल्यात पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाला लुटले! पाईपने मारहाण करत २ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास; सात जणांवर गुन्हा

सांगोला तालुक्यात घरफोड्यांची मालिका; चोरट्यांनी उडविला लाखोंचा ऐवज

कडलासजवळ फळांनी भरलेली पिकअप अडवून दरोडा; चालकास मारहाण, 6.70 लाखांचा ऐवज लंपास

कामाचा ताण आणि मानसिक दडपण: खिलारवाडी येथील शिक्षिकेचा मेंदूतील रक्तस्त्रावाने मृत्यू

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा