टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

आ.बाबासाहेब देशमुख यांच्या साधेपणाने पुन्हा भारावले नागरिक ; रस्त्यावर बसून आजीशी संवाद

On: June 25, 2025 11:01 AM
Follow Us:

सांगोला (प्रतिनिधी):- रस्त्यावर वाट पाहत बसलेल्या वयोवृद्ध आजीशी अत्यंत नम्रपणाने व साधेपणाने रस्त्यावरती बसून प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक केल्यामुळे आ.डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या साधेपणामुळे पुन्हा एकदा नागरिक भारावले असल्याची घटना चिकमहुद ता.सांगोला येथे घडली. ही घटना उपस्थितांपैकी अनेक जणांनी आपल्या मोबाईल मध्ये रेकॉडिंग केली होती. डॉ.बाबासाहेब देशमुख यांचा हा व्हिडीओ गेल्या दोन दिवसपासून सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आम.डॉ.बाबासाहेब देशमुख नुकतेच मतदारसंघातील नियोजित कार्यक्रमासाठी चिकमहुद येथे जात होते. या दरम्यान चिकमहुद येथे वयोवृद्ध आजी आम.डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची वाट पाहत उन्हात बसल्या होत्या. ही बाब कार्यकर्त्यांकडून समजताच आ.डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी स्वतः गाडीतून उतरून रस्त्यावरच बसून आजी सोबत संवाद साधला.या दरम्यान आजीने जागेविषयीचा समस्येचा प्रश्न आ.बाबासाहेब देशमुख यांच्यापुढे मांडला. आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी तत्परतेने आजीच्या प्रश्नाची दखल घेत आजीचा प्रश्न निकाली काढला. त्याचवेळी गावातील जे वयोवृध्द नागरिक असतात त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी गावातील कार्यकर्त्यांकडेही जबाबदारी दिल्या.अत्यंत साधेपणाने रस्त्यावरच बसून आजीच्या अडचणी जाणून घेतल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या साधेपणाचे पुन्हा एकदा दर्शन सर्वसामान्य जनतेला पाहण्यास मिळाले.

आ.डॉ.बाबासाहेब देशमुख सांगोला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. विधानसभा निवडणूकीपूर्वी ज्या पद्धतीने तालुक्यात ते फिरत होते अगदी त्याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीतील भरघोस यशानंतर सुद्धा तालुक्यात फिरत असताना सर्वसामान्यांशी असलेली नाळ तुटू दिली नाही. अनेकदा पदे मिळाल्यानंतर सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करत असतात परंतु आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी आजही सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे तत्परतेने लक्ष देऊन ते सोडवितात हीच बाब सांगोला तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनात घर करून बसली आहे. आमदार झाल्यानंतर राहणीत बडेजाव नाही; वागण्या, बोलण्यात नम्र भाव आणि समाजसेवेचा वसा आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी जपला असल्याचे दिसून येत आहे.

आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख आजपर्यंत आबासाहेबांप्रमाणे साधेपणा जपला आहे. आमदार म्हटले की त्यांचा रुतबा, त्यांचा थाट, कार्यकर्त्यांचा फौजफाटा, आलिशान वाहन असे चित्र साधारणतः आपल्या डोळ्यासमोर येते. त्यातच अलीकडे, आमदारांचा ’स्मार्ट’ लूक ’लय भारी’ आहे. स्मार्टफोन, काळा गॉगल, पांढरा कुर्ता-पायजामा असाच त्यांचा पेहराव असतो. . साधेपणा स्व.भाई.गणपतराव देशमुख यांनी आयुष्यभर जपला होता.आबासाहेब यांचा साधेपणा आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनीही जपला असल्यामुळे ’सर्वसामान्य’पण जपणारे डॉ.बाबासाहेब देशमुख हे आजही अपवादात्मक नजरेस पडतात. त्यामुळे लहानांपासून ज्येष्ठापर्यंत लाडके आमदार म्हणुन सांगोला तालुक्यात सध्या ते अल्पावधीतच प्रसिध्द झाले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सांगोल्यात पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाला लुटले! पाईपने मारहाण करत २ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास; सात जणांवर गुन्हा

सांगोला तालुक्यात घरफोड्यांची मालिका; चोरट्यांनी उडविला लाखोंचा ऐवज

कडलासजवळ फळांनी भरलेली पिकअप अडवून दरोडा; चालकास मारहाण, 6.70 लाखांचा ऐवज लंपास

कामाचा ताण आणि मानसिक दडपण: खिलारवाडी येथील शिक्षिकेचा मेंदूतील रक्तस्त्रावाने मृत्यू

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा