maharashtrapoliticalsolapurtop news

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

18 डिसेंबर 2024 | बुधवार

  • एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे, तर अजितदादांकडे अर्थखातं कायम, खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती
  • ‘गेट वे ऑफ इंडिया’लगत फेरीबोट उलटली: नेव्हीच्या स्पीडबोटने धडक दिल्यामुळे घडली दुर्घटना; 3 ठार, 66 जणांना वाचवले, 7-8 जण बेपत्ता
  • शहा यांचे स्पष्टीकरण – काँग्रेस आंबेडकर आणि आरक्षणविरोधी: माझ्या विचारांचा विपर्यास, खरगे म्हणाले – पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांना बडतर्फ करावे
  • शरद पवारही मस्साजोगच्या मैदानात, बीडला जाऊन संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट
  • मंत्रिपद मिळणार म्हणून कार्यकर्ते गाड्या घेऊन नागपूरला आले होते, त्यांचा अपेक्षाभंग झाला, मला कपॅसिटी असतानाही डावललं गेलं, शिवसेनेचे नाराज आमदार विजय शिवतारेंची आगपाखड
  • परभणी हिंसाचार प्रकरणात महत्त्वाची अपडेट, 3 पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश
  • ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, विंदांचे गद्यरुप या पुस्तकाला मान
  • वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा माणूस, त्याच्यावर अनेक गुन्हे, त्याला अटक झालीच पाहिजे, आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी
  • सभागृहात बंधने आली, तर रस्ता तो मेरा हैं: छगन भुजबळ यांचा NCP अध्यक्ष अजित पवार यांना इशारा अन् OBC एल्गार पुकारण्याचा निर्धार
  • रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती: 106 कसोटीत 537 बळी घेतले; भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज
  • रशियाने तयार केली कर्करोगाची लस: 2025 पासून लोकांना मोफत लावणार; mRNA तंत्रज्ञानाने विकसित, शतकातील सर्वात मोठा शोध
  • लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयांचा उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणात का नाही?: विजय वडेट्टीवार यांचा विधानसभेत सवाल
  • नरेंद्र मोदींना तात्काळ सत्ता सोडावी: आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे आक्रमक; भाजपचा बुरखा फाटल्याचा दावा
  • भाजपचे जुने प्लॅन अंमलात आणण्यासाठी बाबासाहेब अडसर: शहांच्या वक्तव्यातून जुनी मानिकता बाहेर पडली, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
  • याला भेट त्याला भेट, दुसऱ्या दिवशी घरी थेट: फडणवीसांच्या भेटीवरून DCM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले – हा बदल चांगली गोष्ट
  • संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी कारवाई: विष्णू चाटेला बेड्या, हत्या व खंडणीचा आरोप; अटकेतील आरोपींचा आकडा 4 वर
  • मी नाराज नाही, पण दु:खी आहे: मला मंत्रिपद न मिळाल्याने माझी आई आजारी पडली – शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे
  • सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर: तर्कतीर्थ, मर्ढेकरांना मिळलेला सर्वोच्च सन्मान मिळाला म्हणत रसाळांनी व्यक्त केला आनंद!
  • अमित शहांचे वक्तव्य हे सकारात्मक: वक्तव्याचा विपर्यास केला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संपूर्ण देशाला आदर- अशोक चव्हाण
  • विधान परिषदेत खडाजंगी: शहांनी आंबेडकरांचा अपमान केल्याचा विरोधकांचा आरोप तर राजकारणाचा आरोप करत उपसभापतींनी सुनावले
  • भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी टेस्ट ड्रॉ: अखेरच्या दिवशी 25 षटकेच टाकता आली; बुमराह-आकाशदीपची भागीदारी टर्निंग पॉइंट

 

🔹🔹🔹
सौजन्य –

✨ *हॉटेल जयनिला* ✨

चविष्ट व उत्तम शाकाहारी व मांसाहारी …. जेवण मिळवण्याचे एकमेव ठिकाण…
🔸♦️🔸♦️
सोलापूर कोल्हापूर हायवे, सांगोला बायपास राऊत मळा, सांगोला – 413307
मो.8007812004

Related Articles

Back to top button
जॉईन व्हाट्सअप ग्रुप