मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा- राम सातपुते
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार
सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माळशिरस (Malshiras) तालुक्यातील मारकडवाडी (Markadwadi) हे गाव सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. या गावातील ग्रामस्थांनी EVM वर संशय व्यक्त करत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी आंदोलन केलं होतं. मात्र, प्रशासनाने गावात जमाबंदीचे आदेश लागू केल्यानंतर ही मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. दरम्या, या मारकडवाडी गावाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल भेट दिली होती. त्यानंतर उद्या (10 डिसेंबर) याच मारकडवाडी गावात भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि आमदार सदाभाऊ खोत येणार असल्याची माहिती माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी दिली आहे.
मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करण्याचे ग्रामस्थांना आवाहन
शरद पवार यांच्या काल मारकडवाडी गावात झालेल्या सभेला चोख उत्तर देण्यासाठी उद्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे मारकडवाडी गावच्या दौऱ्यावर येणार आहेत. मंगळवारी सकाळी 10:30 वाजता पडळकर आणि खोत यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती माजी आमदार राम सातपुते यांची ट्वीट करत दिली आहे. मोहिते पाटील यांची जुलमी राजवट उध्वस्त करण्याचे ग्रामस्थांना ट्विटद्वारे आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान त्याच दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील मारकडवाडी दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळत आहे.