डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करुया- आमदार भाई डॉ.बाबासाहेब देशमुख
चैत्यभूमीवर जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
सांगोला:भारताच्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाला ६८ वर्ष पूर्ण झाले. देशातील वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. या निमित्त्याने दादर येथील चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी आमदार भाई डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थिती लावली.
आमदार भाई डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आज 6 डिसेंबर रोजी यांनी चैत्यभूमीला भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील दादरमधल्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे. यावेळी चैत्यभूमीवरील स्मृतीस्थळाला पुष्प अर्पण करून आमदार भाई डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक, लेखक, पत्रकार असे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत. इतकंच नव्हे तर त्यांना ‘भारतीय राज्यघटनेचे जनक’ म्हणूनही ओळखलं जातं. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशाला सर्वोत्तम संविधान प्राप्त झालं. डॉ. आंबेडकर यांचा संदेश देशाच्या हिताचा आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करुया, असे आवाहन आमदार भाई डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केले.