Friday, October 18, 2024
Homemaharashtraदिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

बॉम्बच्या धमकीनंतर 7 विमानांचे इमर्जन्सी लँडिंग: 3 दिवसांत 19 उड्डाणांना धमकी; सरकार विमानांमध्ये दुप्पट एअर मार्शल तैनात करणार

जनतेचा आशीर्वाद आम्हाला मिळेलच, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विश्वास, महायुतीचं रिपोर्ट कार्ड सादर, विरोधकांवर हल्लाबोल

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपांवर खल सुरुच; महायुतीकडून 240 जागांवर शिक्कामोर्तब, तर मविआकडून 220 जागा निश्चित, सूत्रांची माहिती

महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुका जोरात लढवणार, राज ठाकरेंचा निर्धार, म्हणाले, जे बोललो ते बोललो, आता माघार नाही

बारामतीबाबत पुढील सात दिवसांमध्ये चित्र स्पष्ट, युग्रेंद्र पवारांची माहिती, बारामतीत युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार लढत होण्याची शक्यता

मनोज जरांगेंकडे 800 इच्छुकांचे अर्ज: आंतरवाली सराटीत तोबा गर्दी, निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्यात पक्षांतराच्या जोरदार हालचाली

विधानसभा निवडणुकीआधी महायुतीला खिंडार: राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार, महादेव जानकर यांची मोठी घोषणा

इस्लामपुरात शरद पवारांच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता सभेत तुफान पाऊस; भर पावसात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

महायुतीच्या जागावाटपावर भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक; फडणवीस, बावनकुळे दिल्लीत पोहोचले

महाराष्ट्रासह देशातून परतीच्या पावसानं घेतला निरोप

सोन्याला पुन्हा झळाळी, 2 दिवसात तब्बल 900 रुपयांची वाढ, खरेदीदारांना मोठा दणकाsss

योगी-राजनाथांसह 9 नेत्यांच्या सुरक्षेतील NSG कमांडो हटतील: आता VIPच्या सुरक्षेसाठी तैनात केले जाणार नाही, त्यांची जागा CRPF जवान घेतील

भाजपच्या ‘त्यागा’ला शिंदे गटाचे ‘त्यागा’ने उत्तर: आमच्या त्यागामुळेच राज्याचे मुख्यमंत्रीपद अन् महायुतीची सत्ता आली – भरत गोगावले

बंगालमध्ये मुलीवर रेप करून हत्या, चेहरा जाळला: प्रियकराला अटक; खून करून मृतदेह पूजा पंडालजवळ फेकल्याचा पोलिसांना संशय

NCP ला बसणार जबरदस्त झटका: राजेंद्र शिंगणे शरद पवार गटात जाणारे हे जवळपास निश्चित; 95% कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचा दावा

निवडणूक जाहीर होताच महायुती मैदानात: मुख्यमंत्री शिंदे राहुल गांधी, उद्धव ठाकरेंवर बरसले; फडणवीस- अजित पवारांचींही टोलेबाजी

न्यायमूर्तींनी लंडनमध्ये 400 कोटींचा व्हिला खरेदी केला: त्या बदल्यात महाराष्ट्राचे सरकार वाचवले; खुलासा करण्याचा संजय राऊतांचा इशारा

शिंदे गटाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी दिला राजीनामा, मनिषा कायंदे यांना विधानपरिषद आमदारकी दिल्यामुळे नाराज असल्याच्या चर्चा

मुंबई इंडियन्सने मोठा मासा लावला गळाला, टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या पारस म्हाम्ब्रे यांची नवीन गोलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या बंगळुरू कसोटीत पावसाचाच खेळ, पहिला दिवस पाण्यात, बीसीसीआयने दुसऱ्या दिवसाची वेळ बदलली

*सौजन्य*
*हॉटेल जयनिला, सांगोला*

 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments