Friday, October 18, 2024
Homepoliticalहंगीरगे आणि जुजारपूर येथील कार्यकर्त्यांचा दीपकआबा गटात प्रवेश

हंगीरगे आणि जुजारपूर येथील कार्यकर्त्यांचा दीपकआबा गटात प्रवेश

सांगोला -मा.आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या कल्पक आणि कार्यकुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून हंगीरगे, गावडेवाडी आणि जुजारपूर येथील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी दीपकआबा गटात प्रवेश केला. ऐन विधानसभेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी दीपकआबा गटात प्रवेश केल्याने यामुळे शेकापला खिंडार पडले आहे. यावेळी मा.आम.दीपकआबा साळुंखे पाटील यांनी संपर्क कार्यालयात सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत सर्वांना सन्मानाची वागणूक देण्याचे आश्वासन दिले. तर प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत दीपकआबांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचे सांगितले.

शेकापच्या नेतृत्वावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विश्वास नसल्याने शेकापमधील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा लाल सलाम करीत दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रवेश केला आहे. सांगोला विधानसभा मतदार संघात गेल्या २५ वर्षापासून मा.आम.दीपकआबा साळुंखे पाटील यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करीत विकासकामांचा झंझावात निर्माण केला आहे. मा.आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या संघटन कौशल्यामुळे आज शेकडो कार्यकर्ते दीपकआबांच्या गटात प्रवेश करीत आहेत. सांगोला तालुक्यातील हंगीरगे, गावडेवाडी आणि जुजारपूर येथील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मा.आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या कल्पक नेतृत्वावर विश्वास ठेवून दीपकआबा गटात प्रवेश केला. यामुळे शेकापला खेळणारा पडले आहे. गेल्याच आठवड्यात बामणी येथील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी दीपकआबा गटात प्रवेश केला होता.

हंगीरगे, गावडेवाडी येथील तानाजी लालबुरे, धनाजी भंडे, तानाजी भंडे, नितीन भंडे, दीपक टोकले, संभाजी टोकले, प्रविण गुजले, गणेश गुजले, नवनाथ चव्हाण, महादेव चव्हाण, बबलू टोकले, संभाजी टोकले, संदीप टोकले, दत्ता भंडे, विशाल रानगे, सागर भंडे (सर), शशी भंडे या शेकापच्या कार्यकर्त्यांनी दीपकआबा गटात प्रवेश केला. तसेच जुजारपूर येथील विजय बजबळे आणि नितीन गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्चना अंकुश यांनी दीपक आबा गटात प्रवेश केला यावेळी मा. आम. दीपक आबा साळुंखे पाटील यांनी पक्षप्रवेश केले त्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी जेष्ठ नेते तानाजीकाका पाटील, यशराजे साळुंखे पाटील, विजय पवार, सुनील गायकवाड यांच्यासह दीपक आबा समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना न्याय देणार

पक्षात सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याने शेकापचे कार्यकर्ते नाराज झाले होते. माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दीपकआबा गटात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देणार आहे. सर्व कार्यकर्त्यांना न्याय देणार असून कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मा.आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगितले.

 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments