Friday, October 18, 2024
Homemaharashtraकोळ्यातील शेकापचा अधिकृत मेळावा नाही, पक्षातील मित्र परिवारांनी घेतला कदाचित त्यामुळेच माझे...

कोळ्यातील शेकापचा अधिकृत मेळावा नाही, पक्षातील मित्र परिवारांनी घेतला कदाचित त्यामुळेच माझे नाव वगळले , जयंत पाटील ही येणार नाहीत -डॉ.अनिकेत देशमुख

सांगोला – कोळा येथे शेकाप कार्यकर्ता मेळावा व सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम शेकापक्षाचा अधिकृत कार्यक्रम नसून पक्षातील एका मित्र परिवाराने आयोजित केल्याचे शेकाप मध्यवर्ती चिटणीस मंडळाचे सदस्य डॉ. अनिकेत देशमुख यांनी सांगितले. शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटनेच्या वतीने पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या स्वागताअध्यक्षतेखाली आज गुरुवार १७ रोजी दुपारी ४:३० वाजता कोळा गटात आयोजित मेळाव्यात डॉ.अनिकेत देशमुख यांना वगळून घेतल्यामुळे सांगोल्यात शेका पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

या मेळाव्याबाबत डॉ. अनिकेत देशमुख म्हणाले , शेकापक्षातील मोठं पद माझ्याकडे असताना मला साधे विचारलेही नाही अगर निमंत्रणही नाही. तुम्ही जर मला न विचारता मेळावा घेत असाल तर पक्ष कोणा एकाच्या दावणीला बांधला आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या चिटणीस व पक्षातील वरिष्ठांना विचारात न घेता एकाधिकार नाही पध्दतीने काम चालू आहे. ते म्हणाले याबाबत तालुका चिटणीस दादाशेठ बाबर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनीही मला विचारून मेळाव्याचा कार्यक्रम घेतला नसल्याचे स्पष्ट सांगितले दरम्यान सत्काराचा कार्यक्रम आचारसंहितेत घेता येत नसतो पण कसा घेतला याबाबत , प्रशासनालाच अधिक माहिती असणार मात्र सदरचा कार्यक्रम शेकापचा अधिकृत नसल्याचे डॉ. अनिकेत देशमुख यांनी सांगितले.

शेतकरी कामगार पक्ष केडरबेस पार्टी आहे. कोळा गटातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तालुका चिटणीस यांच्याशी चर्चा करूनच मेळाव्याचा कार्यक्रम घेतला आहे. भाई जयंत पाटील यांची प्रागतिक पक्षाच्या नेतेमंडळी समवेत जागा वाटपाबाबत पुणे व नाशिक येथे मीटिंग असल्यामुळे ते कोळ्याच्या कार्यक्रमाला येणार नाहीत

-डॉ. बाबासाहेब देशमुख

 

 

सदर मेळाव्याबाबत शेकापचे चिटणीस भाई जयंत पाटील यांच्याकडे विचारणे केली असता कोळ्यातील मेळाव्या विषयी मला काहीच माहिती नाही व मी येणार ही नाही असे सांगितल्यामुळे हा मेळावा शेकापचा अधिकृत मेळावा नसून स्वतःला स्वयंघोषित नेते म्हणून घेणाऱ्या मित्र परिवाराच्या वतीने घेतला आहे त्यामुळे कदाचित माझे पत्रिकेत नाव टाकले नसेल अशा स्पष्ट शब्दात डॉ. अनिकेत देशमुख यांनी कार्यक्रमाविषयी नाराजी व्यक्त केली

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments