Friday, October 18, 2024
Homemaharashtraकोळा येथे गुरुवारी शेकाप व महाविकास आघाडीच्या वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन

कोळा येथे गुरुवारी शेकाप व महाविकास आघाडीच्या वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन

आ.जयंत पाटील, खा धैर्यशील मोहिते पाटील, खा विशाल पाटील, डॉ बाबासाहेब देशमुख यांची उपस्थिती

सांगोला :
सांगोला तालुक्यातील कोळा येथील महाविकास आघाडी शेतकरी कामगार पक्ष जि.प.गट कोळा व डॉक्टर बाबासाहेब देशमुख मित्र परिवाराच्या यांच्या वतीने शेकापचे चिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांच्या हस्ते माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशालदादा पाटील या नुतन खासदारांचा भव्य नागरी सत्कार सोहळा गुरुवार दिनांक 17/10/2024 रोजी दुपारी 4.30 वाजता कोळा तालुका सांगोला येथे अर्जुन चौकात आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास खासदार धैर्यशिल (भैय्या) मोहिते-पाटील (लोकसभा सदस्य, माढा), खासदार विशाल (दादा) पाटील (लोकसभा सदस्य, सांगली), स्वागताध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख (अध्यक्ष, पुरोगामी युवक संघटना महा. राज्य.) तर प्रमुख उपस्थिती म्हणून रामहरी (आप्पा) रुपनवर (माजी आमदार), प्रा.पी.सी. झपके (सर) (प्रांतिक सदस्य, कॉग्रेस कमिटी), उत्तम जानकर (चेअरमन, चांदापूरी साखर कारखाना), श्री.बाबुराव गायकवाड (जेष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), अरविंद पाटील (तालुकाध्यक्ष, शिवसेना उबाठा), श्री.दादाशेठ बाबर (चिटणीस, शेकाप), श्री.संगम धांडोरे, श्री.दिपक गोडसे (अध्यक्ष, पुरोगामी युवक संघटना सांगोला) असणार आहेत.

तरी कोळा जिल्हा परिषद गटातील शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आयोजकाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments