Friday, October 18, 2024
Homemaharashtraकार्तिक यात्रा कालावधीत भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, गर्दी...

कार्तिक यात्रा कालावधीत भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, गर्दी व्यवस्थापन व स्वच्छतेला प्राधान्य – प्रांताधिकारी- सचिन इथापे

पंढरपूर (दि.15):-  कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी कार्तिकी एकादशी असून यात्रेचा कालावधी दि. 02 ते 15 नोव्हेंबर 2024 आहे. यात्रा कालावधीत  65 एकर (भक्ती सागर) येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी 65 एकर (भक्ती सागर) येथे  शेगांवदुमाला ते जुना दगडी पुल या ठिकाणी कोणतेही अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेवून गर्दीचे व्यवस्थापनाबाबत सूक्ष्म नियोजन करावे.तसेच यात्रेत येणाऱ्या भाविकांची कोणतेही गैरसोय होणार नाही याची दक्षता सर्व संबधित विभागाने घ्यावी अशा, सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे  यांनी दिल्या.

कार्तिकी यात्रा कालावधीत  भाविकांच्या सोयी-सुविधासाठी  प्रशासनाकडून करण्यात  येणाऱ्या नियोजनाबाबत प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली. बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, तहसिलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे,  कार्यकारी अभियंता अमित निंबकर, पोलीस निरिक्षक विश्वजीत घोडके, मंदीर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रांताधिकारी  इथापे म्हणाले,  यात्रा कालावधीत भाविकांच्या सुविधेबाबत नगर पालिका व मंदिर प्रशासनाची महत्वाची जबाबदारी आहे.या कालावधीत  नगरपालिकेने स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा मुबलक पाणी पुरवठा करावा, वाळवंटातील तसेच शहरातील अतिक्रमणे तात्काळ काढावीत.वाळवंटात पुरेशा प्रकाश राहिल याबाबत नियोजन करावे,धोकादायक इमारतींवर ठळक सूचना फलक लावावेत. अनाधिकृत फलक काढावेत.मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. मंदीर समितीने व नगरपालिकेने प्रदक्षिणा मार्ग, नदीपात्रात आवश्यक ठिकाणी बॅरकेंटींग करावे व अग्निशामक यंत्रणा कार्यरत ठेवावी .कार्तिकी यात्रा कालावधीत मंदीर समितीने  जादाचे पत्राशेड उभारावेत, दर्शन रांगेत ठिकठिकाणी सूचना फलक लावावेत. मंदीरात तसेच मंदीराभोवती करण्यात येणाऱ्या विद्युत रोषणाईचे फायर ऑडीट व स्काय वॉकचे स्ट्रॅक्चरल ऑडीट करुन घ्यावे.

तसेच कार्तिक यात्रा कालावधीत वाखरी येथे जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणावर भरत असल्याने पशुसंवर्धन विभागाने पशुवैद्यकीय पथकांची नेमणूक करावी. तसेच संबधित विभागाने जनावरांच्या व पशुपालकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. अन्न व औषध प्रशासनाने  शहर व परिसरातील  खाद्य पदार्थाच्या दुकानांची तपासणी करावी. एस.टी महामंडळाने प्रवाशी वाहतुकीचे नियोजन करुन बसस्थानकावर आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात अशा सूचनाही प्रांताधिकारी इथापे यांनी दिल्या.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.भोसले म्हणाले, यात्रा कालावधीत वाहतुक व्यवस्था सुरळीत रहावी तसेच भाविकांना सुरक्षेबाबत कोणतेही अडचण येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक नियोजन केले आहे. नगरपालिकेने शहरातील पार्कीग ठिकाणची लेव्हलिंग करुन झाडे-झुडपे काढावेत तसेच प्रकाश व्यवस्था करावी.मंदीर व मंदीर परिसरात फिरत्या  विक्रेत्यांमुळे मोठ्या प्रमाणात भाविकांना त्रास होतो यासाठी जादा हॉकर्स पथकाची नेमणूक करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री. श्रोत्री म्हणाले, कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांना जलद व सुखकर दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीकडून योग्य नियोजन करण्यात आले असून, दर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये यासाठी जादा सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.  दि. 04 नोव्हेंबर रोजी श्रींचा पलंग काढून प्रक्षाळपुजेपर्यंत म्हणजे दि. 04 ते 20 नोव्हेंबर दरम्यान 24 तास श्रींचे दर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कालावधीत पत्राशेड येथे पूर्णवेळ अन्नछत्र सुरू ठेवण्यात येणार आहे. दर्शन रांगेतील भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व आवश्यक सोई सुविधा उपलब्ध उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी बोअरवेल, हातपंपाची पाणी तपासणी करण्यात येत आहे. पावसामुळे शहरात पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरु असून, स्वच्छतेसाठी जादा हंगामी स्वच्छता कर्मचाऱ्यांची  नेमणूक करण्यात येणार असल्याचे उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर यांनी सांगितले.

 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments