Friday, October 18, 2024
Homemaharashtraराजकोट किल्ला पुतळा दुर्घटना प्रकरणी उत्तर प्रदेशातील आरोपीला अटक, 3 दिवसांची पोलीस...

राजकोट किल्ला पुतळा दुर्घटना प्रकरणी उत्तर प्रदेशातील आरोपीला अटक, 3 दिवसांची पोलीस कोठडी

Malvan Shivaji Maharaj statue News Accused from Uttar Pradesh arrested in Rajkot Fort statue accident case 3 days in police custody राजकोट किल्ला पुतळा दुर्घटना प्रकरणी उत्तर प्रदेशातील आरोपीला अटक, 3 दिवसांची पोलीस कोठडी

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज  पुतळा (Shivaji Maharaj statue) दुर्घटना प्रकरणी अजून एका आरोपीला उत्तर प्रदेश मिर्जापुर येथून अटक करण्यात आली आहे. पुतळ्याच्या जोडणीचे काम करणाऱ्या परमेश्वर रामनरेश यादव याला मिर्जापुर उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याच्या तपासामध्ये त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने संशयित आरोपीला अटक केली आहे. आरोपीला मालवण दिवाणी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुतळ्याच्या वेगवेगळ्या भागांची जोडणी करताना निकृष्ट दर्जाचे काम  केल्याने गंज लागून पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडल्याचे तांत्रिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. त्यामुळं याप्रकरणी  तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. राजकोट किल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्यानंतर शिवभक्तांच्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात तीव्र भावना उमटल्या होत्या. अखेर राज्य शासनाने राजकोट किल्लावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments