Friday, October 18, 2024
Hometop newsअर्ध्या वाटेत शिंदेंना सोडलं, गुजरातहून परतणाऱ्या कैलास पाटलांना ठाकरेंकडून गिफ्ट, थेट धाराशीवची...

अर्ध्या वाटेत शिंदेंना सोडलं, गुजरातहून परतणाऱ्या कैलास पाटलांना ठाकरेंकडून गिफ्ट, थेट धाराशीवची उमेदवारी!

vidhan sabha election 2024 mla kailash patil will contest from dharashiv constituency from uddhav thackeray group अर्ध्या वाटेत शिंदेंना सोडलं, गुजरातहून परतणाऱ्या कैलास पाटलांना ठाकरेंकडून गिफ्ट, थेट धाराशीवची उमेदवारी!

धाराशीव –

विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राज्यातील प्रमुख पक्ष आपापल्या सक्षम उमेदवारांची घोषणा करत आहेत. दरम्यान, उमेदवार जाहीर करण्याच्या स्पर्धेत उद्धव ठाकरे यांचा पक्षदेखील मागे राहिलेला नाही. या पक्षाने धाराशीव मतदारसंघासाठीही आपला उमेदवार निश्चित केला आहे. शिवसेना पक्षफुटीवेळी एकनाथ शिंदेंची साथ सोडून मुंबईकडे परतणारे आमदार कैलास पाटील यांना धाराशीवची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे.

ठाकरेंचा धाराशीवचा उमेदवार ठरला

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून नुकतेच वरूण सरदेसाई यांना वांद्रे पूर्व या मतदारसंघातून तिकीट दिले जाणार आहे. त्यानंतर आता ठाकरे यांच्या पक्षाने उस्मानाबाद या मतदारसंघासाठीदेखील आपला उमेदवार जवळपास निश्चित केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना पक्षात बंड झाले. याच बंडादरम्यान, शिंदे यांची साथ सोडून परत मुंबईला परतणारे कैलास पाटील यांना ठाकरे धाराशीव मतदारसंघासाठी तिकीट देणार आहेत. तसे संकेत आमदार उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

कैलास पाटील यांना कामाला लागण्याच्या सूचना

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघासाठी कैलास पाटील यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडून कैलास पाटील यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबईत कैलास पाटील आणि आदित्य ठाकरे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत पाटील यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे.

 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments