महाराष्ट्र

दुर्दैवी! महाराष्ट्र भूषण दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला

महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागले. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या श्री सदस्यांना उष्माघात झाला. उष्माघाताने मृत्यू होणाऱ्यांचा आकडा वाढतच चालला आहे. उष्माघातामुळे आता आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आखडा १२ वर पोहचला आहे. 

कल्याणमध्ये राहणाऱ्या श्री सदस्याचा मृत्यू झाला आहे.
कल्याणमध्ये राहणाऱ्या विनायक हळदणकर (५५ वर्षे) या श्री सदस्याने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. भर उन्हात बसल्यामुळे त्यांना उष्माघात झाला. त्यांना नवी मुंबईच्या पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!