अभिनेता अल्लू अर्जुन आज त्याचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक धमाकेदार सरप्राईज मिळाले आहे. अल्लूचा आगामी ब्लॉकबस्टर चित्रपट’पुष्पा २’ चा टीझर आता प्रदर्शित करण्यात आला आहे.
या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या टीझरची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. पुन्हा एकदा ‘पुष्पा २’ अर्थात ‘पुष्पा: द रूल’ या चित्रपटात अल्लूसोबत ‘श्रीवल्ली’ रश्मिका मंदाना ही जोडी पाहायला मिळणार आहे.
‘पुष्पा 2’ मधील रश्मिका आणि अल्लू यांच्या भूमिकांचे पोस्टर्स आधीच रिलीज करण्यात आले होते. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. हेच लक्षात घेऊन आता’पुष्पा’च्या निर्मात्यांनी अल्लूच्या वाढदिवसानिमित्त ‘पुष्पा २’ चित्रपटाचा टीझर रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यामुळेच आज या चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज करण्यात आला आहे. ‘पुष्पा २’च्या टीझरमध्ये अल्लू अर्जुन एका ॲक्शन सीक्वेन्समध्ये साडी अवतारात दिसला आहे. अल्लू अर्जुनचा हा लूक चित्रपटातील जत्रेच्या सीक्वेन्सचा एक भाग आही. जत्रा सीक्वेन्स हे या चित्रपटाचे खास आकर्षण असल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपटातील सर्वात मोठा भाग असणार आहे.