Saturday, September 21, 2024
Hometop newsउन्हाळ्यात फिरण्याचा प्लान करताय?

उन्हाळ्यात फिरण्याचा प्लान करताय?

उन्हाळा सुरु झाला की, आपल्याला थंड ठिकाणी फिरण्याची इच्छा होते. शाळा-कॉलेजला सुट्टी असल्यामुळे आपण फिरण्याचे अनेक प्लान करतो. फिरण्याचा प्लान करत असाल तर अरुणाचल प्रदेशमधील थंडगार पर्यटनस्थळांना नक्की भेट द्या. अरुणाचल प्रदेश हे उगवत्या सूर्याची भूमी म्हणून ओळखले जाते. हे अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण आहे.

हिवाळ्यात या ठिकाणी तापमान दिवसा आणि रात्री उणे अंशापर्यंत खाली जाते. तर उन्हाळ्यात येथील दृश्य रोमांचक आणि सुंदर असते. तुम्हीही उन्हाळ्यात फिरण्याचा विचार करत असाल तर अरुणाचल प्रदेशातील काही पर्यटनस्थळांना भेट द्या.तवांग मठ हा भारतातील सर्वात मोठा बौद्ध मठ आहे. या मठाची स्थापना तवांग युद्ध स्मारक म्हणून करण्यात आली. ज्याची रचना चाळीस फूट इतकी आहे.

हे शहर तवांग नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. नुरंग धबधबा हा नुरनांग वॉटर फॉल आणि बोंग वॉटर फॉल असेही म्हणतात. हा आपल्या देशातील सर्वात सुंदर वॉटर फॉल्सपैकी एक आहे. बाम ला पास हा भारतातील अरुणाचल प्रदेश आणि तिबेटच्या लाहोखा विभागामधील हिमालय पर्वताचा एक पर्वतीय खिंड आहे. तवांग शहरापासून ३७ किलोमीटर अंतरावर समुद्रसपाटीपासून १५,२०० फूट उंचीवर असून अतिशय नयनरम्य ठिकाण आहे. त्रिकोणी टेकड्यांमध्ये हे ठिकाण वसलेले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments