खेळ
वनडे सामन्यापूर्वीच टीम इंडियासाठी वाईट बातमी

श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाला झटका बसला आहे. दुखापतीनंतर पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह आता या वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे. बुमराहला आधी या मालिकेचा भाग बनवण्यात आले नव्हते, पण नंतर त्याचा संघात समावेश करण्यात आला.
आता पुन्हा एकदा बुमराहला संघातून वगळण्यात आले आहे. बुमराह अद्याप गुवाहाटीला पोहोचला नाही, जिथे टीम इंडियाला १० जानेवारीला पहिला एकदिवसीय सामना खेळायचा आहे. ३ जानेवारी रोजी बीसीसीआयने एकदिवसीय संघात बदल केला होता. त्यावेळी श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत बुमराहचा समावेश करण्यात आला होता.
पण वन डे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआयला कोणताही धोका पत्करायचा नाही. यामुळेच बुमराहला शेवटच्या क्षणी मालिकेतून बाहेर ठेवण्यात आले आहे, जेणेकरून कोणतीही घाई होऊ नये आणि त्याला परतण्यासाठी पूर्ण वेळ मिळेल.
