टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

ब्रेकिंग! अनिल परबांविरोधात मध्यरात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल

On: November 8, 2022 5:11 AM
Follow Us:

दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी शिवसेनेचे नेते अनिल परब विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे, याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरून दिली.
पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करून साई रिसॉर्ट उभारल्याचा आरोप सोमय्या यांनी परब यांच्यावर केला होता. या रिसॉर्टच्या खरेदीसाठी गैरमार्गाने कमावण्यात आलेला पैसा वापरला, असा आरोपही करण्यात आला होता. 

नियमांचे उल्लंघन करत बांधलेलं हे रिसॉर्ट पाडावं, अशी मागणी सोमय्या यांनी प्रशासनाकडे करण्यात आली होती. आता रिसॉर्टचं पाडकामही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येणार आहे. त्याआधी परब यांच्यासह ३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रुपा दिघे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये परब, सुरेश तुपे आणि अनंत कोळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now