टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Pandharpur Ambegaon Well Collapse: विहिरीच्या मोजमापासाठी उतरले, अचानक ढिगारा कोसळल्याने अडकले; 24 तासांनी 4 मजूरांचे मृतदेह सापडले, पंढरपुरातील आंबेगावातील सुन्न करणारी घटना

On: November 16, 2026 12:40 PM
Follow Us:

Pandharpur Ambegaon Well Collapse: पंढरपूर तालुक्यातील आंबे गावातील शेतकरी निवास शिंदे यांच्या विहिरीत हे काम सुरू होते. पूर्ण झालेल्या विहिरीचे मोजमाप सुरू असताना अचानक विहिरीचा ढिगारा आणि कठडा कोसळला.

Pandharpur Ambegaon Well Collapse पंढरपूर: सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात धक्कादायक घटना घडली. पूर्ण झालेल्या विहिरीचं मोजमाप सुरू असताना अचानक ढिगारा (Pandharpur Ambegaon Well Collapse) कोसळला. यात चार मजुरांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासांपासून एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू होतं. अखेर आज सकाळी 11 वाजता चारही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात NDRF टीमला यश मिळालं. शेतकरी निवास शिंदे यांच्या विहिरीचं काम पूर्ण झालं होतं. जवळपास 50 फूट खोलीच्या या विहिरीचं मोजमाप घेण्याचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. सदर दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच बेकायदा विहीर खोदणे आणि धोकादायक ब्लास्टिंग याचीही चौकशी होणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

नेमकं काय घडलं? (Pandharpur Ambegaon Well Collapse)

पंढरपूर तालुक्यातील आंबे गावातील शेतकरी निवास शिंदे यांच्या विहिरीत हे काम सुरू होते. पूर्ण झालेल्या विहिरीचे मोजमाप सुरू असताना अचानक विहिरीचा ढिगारा आणि कठडा कोसळला. या दुर्घटनेत 4 मजूर ढिगाऱ्याखाली अडकले होते. तर दोन मजूर आंबे गावचे आणि दोन आणवलीचे होते. या घटनेत चारही मजूरांचा मृत्यू झाला आहे. शेतात जेसीबीच्या साहाय्याने विहीर खोदण्याचे काम सुरू असताना काल सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामध्ये मंगेश मोरे (वय 35), सिद्धेश्वर घाडगे (वय 45), आबासाहेब घोडके (वय 50) आणि तानाजी घोडके (वय 54) हे चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकले.  या दुर्घटनेतील दोन मजूरांना सुरुवातीला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले होते. त्यानंतर पहाटेच्या सुमारास एक, त्यानंतर सकाळी 10 आणि 11 वाजताच्या सुमारास उरलेल्या दोन मजूरांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात एनडीआरएफ टीमला यश मिळाले. सदर घटनेला 24 तास उलटल्यानंतर चारही मजूरांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढले.

विहीर दुर्घटनेची समिती स्थापन करून चौकशी होणार-जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन (Ambegaon Well Collapse)

पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात दगडाचा ढिगारा कोसळून चार कामगार अडकल्याची घटना घडली. या घटनेची संपूर्ण चौकशी पालकमंत्र्यांच्या आदेशाने एक समिती स्थापन करून होणार आहे. या शोधकार्यात विहिरीतून बाहेर काढलेल्या दगडांची तपासणी करून त्यावर असणाऱ्या केमिकलची ही तपासणी होणार असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली. तसेच , सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतांमध्ये सुरू असलेल्या व परवानगी घेतलेल्या किंवा न घेतलेल्या विहिरींचे  सर्वेक्षण करणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे विहीर दुर्घटनेनंतर सोलापूर जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणावर अलर्ट मोडवर आहे.

दगडांचा ढिगारा कोसळून चार कामगार अडकल्याची घटना अत्यंत दुर्दैवी- पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore On Well Collapse)

पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे विहीर खोदकाम सुरू असताना मातीचा व दगडांचा ढिगारा कोसळून चार कामगार अडकल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी आहे. आज पहाटे घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली तसेच परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. शेतात जेसीबीच्या साहाय्याने विहीर खोदण्याचे काम सुरू असताना काल सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामध्ये मंगेश मोरे (वय 35), सिद्धेश्वर घाडगे (वय 45), आबासाहेब घोडके (वय 50) आणि तानाजी घोडके (वय 54) हे चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन काल सकाळपासूनच जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याशी सातत्याने संपर्क साधत बचावकार्याची प्रत्येक टप्प्यावरील माहिती घेतली. तसेच अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या. बचावकार्याला गती मिळावी आणि प्रत्येक शक्य ते प्रयत्न तातडीने व्हावेत, यासाठी प्रशासनाशी सातत्याने समन्वय ठेवला.घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, पंढरपूर नगरपालिका अग्निशामक दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक, तालुका प्रशासन आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. चार कुटुंबांच्या आयुष्यात अचानक आलेले हे दुःख शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. दोन कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृत कामगारांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Latur DCC Bank Election Result 2026: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल जाहीर; देशमुखांच्या सहकार पॅनला स्पष्ट बहुमत, पाहा विजयी उमेदवारांची यादी

अखेर आतली बातमी फुटलीच? विलिनीकरणावर विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान, कुणाला मंत्रिपद…

मोठी बातमी! दिल्लीत घडामोडींना वेग; सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेलांमध्ये बैठक

NCP Merger: आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी पुण्यातील जिजाई बंगल्यावर ‘त्या’ 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु

Heavy Rain Alert : वारं फिरलं, आता थेट 10 दिवस तडाखेबाज पाऊस, 184 KM ताशी…

Mudra Loan: विना हमी 20 लाखांचं कर्ज मिळणार, मोदी सरकारचा योजनेत मोठा बदल, काय आहे अपडेट?