टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मुंडे फडणवीसांच्या भेटीला; नेमकं काय ठरलं?

On: October 1, 2026 5:41 PM
Follow Us:

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. या भेटीमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आज पत्रकार परिषद घेत वाल्मिक कराडच्या प्रकरणावरून गंभीर आरोप केले. कराड तुरुंगात असतानाही काही कार्यकर्त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा सोनवणे यांनी केला. तसेच या प्रकरणात राज्य सरकार आणि गृह विभागाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातील भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मात्र, दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, मुंडे काही खासगी कामानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आले असल्याचं सांगितलं जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now