टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर फडणवीसांचं वक्तव्य; अग्निवीरांबाबत मोठी घोषणा

On: September 29, 2026 3:11 PM
Follow Us:

मुंबईत 4 ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, आंदोलनात मांडण्यात येणाऱ्या मुद्द्यांची सत्यता तपासून पाहणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्रातील अग्निवीरांच्या शासकीय सेवेसंदर्भातही महत्त्वाची माहिती दिली. अग्निवीरांची पहिली बॅच चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून परतणार आहे. त्यातील महाराष्ट्रातील अग्निवीरांना पोलीस आणि इतर संबंधित शासकीय सेवांमध्ये सामावून घेण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, या भरतीसाठी अग्निवीरांना स्वतंत्र परीक्षा किंवा प्रशिक्षणाची अट राहणार नाही. तसेच वयोमर्यादेत चार वर्षांची सूट देण्यात येणार आहे. पदांची संख्या अपुरी पडल्यास अतिरिक्त पदे निर्माण करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. नौदलातील अग्निवीरांना कोस्टल सिक्युरिटीमध्ये संधी देण्याची माहितीही त्यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now