सोशल मीडिया स्टार आणि अभिनेता फैसल शेख, म्हणजेच ‘मिस्टर फैजू’, सध्या त्याच्या लग्नाच्या चर्चेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्याच्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेची काही दृश्ये व्हायरल झाली आहेत. त्यामुळे फैजू लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
व्हायरल झालेल्या एका दृश्यात फुलांनी सजवलेल्या बोर्डवर ‘MR. FAISU & TANYA’ अशी नावे दिसत आहेत. त्यामुळे Tanya ही फैजूची होणारी पत्नी आहे का?, असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे.
मात्र, दुसरीकडे व्हायरल झालेल्या आमंत्रण पत्रिकेवर Mohd Mudassir आणि Nikhat Fatima अशी नावे दिसत आहेत. या पत्रिकेवर निकाह 18 ऑक्टोबर 2026 आणि रिसेप्शन 19 ऑक्टोबर 2026 रोजी असल्याचे नमूद आहे. त्यामुळे ही पत्रिका नेमकी फैजूच्या लग्नाची आहे की अन्य कौटुंबिक सोहळ्याची, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
फैसल शेखने यापूर्वी 2026 मध्ये लग्न करण्याचे संकेत दिले होते. मे महिन्यातील एका पॉडकास्टमध्ये त्याने जुलैमध्ये लग्न होणार नसल्याचे सांगताना, मात्र याच वर्षी लग्न करणार असल्याचे स्पष्ट केले होते.
सध्या ‘Tanya’ हे नाव सोशल मीडियावर चर्चेत असले तरी फैजू किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून वधूच्या नावाबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे व्हायरल पत्रिकेवरून लग्न आणि वधूची ओळख निश्चित झाली आहे, असे म्हणता येणार नाही.








